एक्स्प्लोर

मोठी बातमी: केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणेची अधिसूचना जारी; जाणून घ्या सर्वेक्षणाबाबत या 10 महत्त्वाच्या गोष्टी

जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ भारताच्या महानिबंधक कार्यालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

New Delhi : केंद्र सरकारने आज देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे. 2027 मध्ये ही जनगणना होणार असून ती दोन टप्प्यात केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा करताना सांगितलं . यासाठी प्रत्येक स्तरावरील लोकांकडून माहिती घेतली जाणार असून हे डिजिटल माध्यमातून म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन्समधून केले जाईल . दरम्यान 2027 ला होणाऱ्या या जनगणनेच्या सर्वेक्षणाबद्दल या 10 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे .

2027 च्या जनगणनेशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी

1) या जनगणनेत सर्वेक्षण दोन टप्प्यात होणार असून 34 लाख सर्वेक्षक घरोघरी, शेतात जाऊन माहिती गोळा करतील .
2) याशिवाय 1.3 लाख जनगणना अधिकारी तैनात केले जातील .हे सर्व कर्मचारी जनगणनेसाठी क्षेत्रीय सर्वेक्षणाचे काम करतील .याचा संपूर्ण विदा तयार केला जाईल .  या अंतर्गत जातीनिहाय प्रश्नही विचारले जातील .
3)जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाईल .यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे
4)मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेत पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची मोजणी (HLO) केली जाईल .
5)यामध्ये प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती,मालमत्ता आणि सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल.
6 )जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या शास्त्रीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाईल .
7)या जनगणनेत जातीय जनगणना देखील केली जाईल .जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही सोळावी जनगणना आहे .आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे .
8) लोकांना स्वगणनेची तरतुदही उपलब्ध करून दिले जाईल .
9)जनगणनेशी संबंधित सर्व डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जाईल .
10)यामध्ये जनगणनेसाठी डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे तसेच प्रत्येक टप्प्यावर डेटाची गळती होऊ नये यासाठी कठोर व्यवस्था करण्यात येणार आहे .

अधिसूचनेत काय?

भारत सरकारने 16 जून 2025 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली.
संपूर्ण भारतात जनगणना वर्ष 2027 मध्ये सुरू होणार 
देशातील बहुतेक भागांसाठी जनगणनेची संदर्भ तारीख – 1 मार्च 2027
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित/गैर-सामायिक भागांसाठी संदर्भ तारीख – 1 ऑक्टोबर 2026
2019 मधील अधिसूचनेची रद्दबातल घोषणा, मात्र त्याअंतर्गत आधी केलेली कार्यवाही वैध राहील.
अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

1881 ते 1971 पर्यंत लोकसंख्या कशी वाढली ?

इतिहासात डोकावले तर, 1881 ते 1971 दरम्यान उत्तर भारतात लोकसंख्येची वाढ इतर प्रदेशातील लोकसंख्येपेक्षा सर्वात कमी ( 115% ) होती . दक्षिण भारतात 193%, पश्चिम भारतात 168% तर पूर्व भारतात 213% वाढ झाली . त्याचवेळी 881 ते 2011 दरम्यान देखील उत्तर भारतात सर्वात कमी वाढ नोंदवली गेली .ही वाढ 427% एवढी होती .1881 ते 2011 दरम्यान देखील उत्तर भारत 427 टक्यांच्या वाढीसह तळाशी राहिला . या काळात दक्षिण भारतात 445% पश्चिम भारतात 500% व पूर्व भारतात 535 टक्क्यांची वाढ झाली .

 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
महाराष्ट्रात दुष्काळ! उत्तर प्रदेशात महापूर, आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
आपण एकत्र आलं पाहिजे, ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना संदेश, सांगितला इंडिया आघाडीचा पुढचा प्लॅन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
राज्यात दुष्काळ जाहीर होताच राधाकृष्ण विखे पाटील दिल्लीत दाखल, पुत्रासह अमित शाहंची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Ahilyanagar : 'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
'मातोश्री' वृद्धाश्रमात रक्ताचा सडा! हात थरथरण्यावरून चिडवले म्हणून वृद्धाने लोखंडी रॉडने दोन सहकाऱ्यांना संपवले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2026 | शनिवार
Gyanesh Kumar: गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत चौफेर घेरताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची दोन आयुक्तांसोबत बैठक, महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला
Embed widget