नवी दिल्ली : 2021 च्या जनगणनेची सुरुवात पुढील वर्षी 16 मे पासून होणार आहे. उत्तर प्रदेशात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे पासून सुरु होईल आणि हे अभियान 30 जून 2020 पर्यंत चालेल. यादरम्यान सुमारे पाच लाख कर्मचारी जनगणनेच्या ड्यूटीसाठी तैनात असतील. विशेष म्हणजे यंदा जनगणनेसाठी मोबाईल अॅपचाही वापर होणार आहे. देशात 1872 पासून आतापर्यंत ही सोळावी आणि स्वातंत्र्यानंतरची आठव्यांदा जनगणना होणार आहे.
पहिल्या टप्प्यात संपूर्ण प्रदेशातील घरांची मोजणी होईल. याशिवाय गाव, शहर, वस्ती, मोहल्ला, कॉलनीमध्ये राहणाऱ्या घरांसाठी स्वयंपाकघर, शौचालय, वीज, नाले, इंधन, पाणी या सुविधांचे आकडे गोळा केले जातील. दुसरा टप्पा 9 फेब्रुवारी 2021 पासून 28 फेब्रुवारी दरम्यान प्रत्यक्ष जनगणना होईल, ज्यात लोकांची गणना केली जाईल.
उत्तर प्रदेशाच 16 मेपासून पहिला टप्पा
उत्तर प्रदेशात जनगणना 2021 च्या पहिल्या टप्प्याचं काम सुरु करण्यासाठी प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं काम 16 मे 2020 पासून 30 जून 2020 दरम्यान केलं जाईल.
एप्रिलपासून सप्टेंबर 2020 पर्यंत हाऊस-लिस्टिंग
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, जनगणना 2021 यंदा 16 भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. जनगणना 2021 च्या माहितीच्या संग्रहासाठी एक मिक्स मोड दृष्टिकोन वापरला जाणार आहे. जनगणना दोन टप्प्यात आयोजित केली जाईल. एप्रिलपासून सप्टेंबर 2020 पर्यंत हाऊस-लिस्टिंग आणि हाऊसिंग जनगणना होईल. यानंतर 9 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान लोकसंख्येची गणना होईल.
सुमारे 8 हजार 754 कोटी रुपये खर्च
नित्यानंद राय म्हणाले की, जनगणना 2021 आयोजित करण्यासाठी सुमारे 8 हजार 754 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गणना करणारे अधिकारी मोबाईल अॅपचाही वापर करुन डेटा जमा करु शकतात