एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद
श्रीनगर: पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नौशेरा आणि कृष्णा घाटीमध्ये गोळीबार केला. या गोळीबारात जनरल रिजर्व इंजिनिअरिंग फोर्सचा एक जवान शहीद झाला आहे.
पुछँचे पोलीस उपायुक्त हारुन मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन नागरिकही जखमी झाले आहेत.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षा दलानं आज (गुरुवारी) सकाळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तसंच घटनास्थळावरुन दोन एके-47 आणि मोठ्या प्रमाणात बॉम्ब हस्तगत केले. तेथील परिस्थिती पाहता उत्तर काश्मीरमधील मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे. बारामुला, हंदवाडा, कुपवाडा आणि सोपोरमध्ये मोबाइल सेवा बंद आहेत. तसेच सर्व इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement