एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2020 | सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे, 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं. त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या.

नवी दिल्ली : CBSE Class X Result 2020 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्वीटवरून ही घोषणा केलीय. त्यांच्या या ट्वीटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आता फक्त 24 तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सीबीएसईचा बारावीचा निकाल काल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित होतं. त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. काल बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहावीच्या निकालाकडे पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते.

सीबीएसईचा दहावीचा निकालाची तारीख स्वतः केंद्रीय मंत्र्यांनीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना उद्या निकाल हातात पडण्याची प्रतिक्षा आहे.

यावर्षी कोरोना व्हायरस साथीमुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अनेक विषयांचे पेपर झाले असले तरी उत्तर भारतात, मात्र सर्व पेपर झालेले नाहीत. सीबीएसई परीक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला होता. सीबीएसई बोर्डाने दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या, मात्र अनेक राज्यांनी त्या तारखांना परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवल्याने सीबीएसईने 1 ते 15 जुलै दरम्यान जाहीर केलेल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. तसंच सीबीएसईकडून न्यायालयात 15 जुलै किंवा त्यापूर्वी दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं

बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही फक्त वेबसाईटवर जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सीबीएसईकडून पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. तसंच आयसीएसई किंवी सीबीएसई बारावी प्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका, उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डिजिलॉकरमध्ये अपलोड केलं जाण्याची शक्यता आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा.. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नवं पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल. या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि हॉल तिकीट आयडी भरावा लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.

महत्त्वाच्या बातम्या

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांना हादरा, लोकांमध्ये भीतीचं वातावरण
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
अयोध्येचे राममंदिर हिंदू दरोडेखोरांनी लुटूनही सकल हिंदूचे महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी हात चोळत तोंडातल्या तोंडात जीभ फिरवत बसले आहेत, सामनातून सडकून प्रहार
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश
NCERT कडून नववीच्या सामाजिक शास्त्र विषयातून संविधानाची प्रस्तावनाच वगळली; 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्दांनाही केराची टोपली, वादग्रस्त ठरलेल्या SIR आणि आणीबाणीचा समावेश

व्हिडीओ

Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत उद्धव ठाकरेंकडून पुढचं पाऊल, आगामी निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत लाखभर मतं मिळवली, उद्धव ठाकरेंकडून आताच उमेदवारी जाहीर, कोण आहेत डॉ. सिद्धार्थ देवळे?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; शेगाव मंदिर परिसरातील पेढे, प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड, मिठाई दुकानातील पदार्थांचे घेतले नमुने
Share Market : किर्लोस्कर ते सुवेन फार्मास्युटिकल्समध्ये स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
स्टॉक मार्केटमध्ये चार दिवसात 5 स्टॉकनी दिला 10 टक्क्यांहून अधिक परतावा, जाणून घ्या कारण
Pandharichi wari: माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
माऊलींच्या पालखीचे अश्व हिरा अन् मोती, अंकलीतून आळंदीकडे प्रस्थान; 300 किमीचा प्रवास, अनेक मुक्काम
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंच्या आमदाराने 40 लाख मागितले, व्हिडिओ व्हायरल होताच आमदारपुत्राचे संतेज पाटलांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
मोठी बातमी! आमदार सुधीर गाडगीळांच्या कारचा भीषण अपघात, एअर बॅग उघडल्याने अनर्थ टळला, किरकोळ दुखापत
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
Embed widget