Parambir Singh Case : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज ठाण्यात नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. 234 दिवसांनंतर परमबीर सिंह काल (गुरुवारी) मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर कांदिवलीत गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ते ठाण्यात दाखल झालेत. धमकी देऊन साडे तीन कोटींची खंडणी उकळल्याचा परमबीर आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे. 


ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंहांविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दिलेल्या वेळेत आरोप पत्रच पोलिसांनी दाखल केले नाही. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना पोलीस अधिकारी गुन्ह्याबाबत कागदपत्रं देखील उपलब्ध करून देत नाहीत म्हणून तक्रार दाखल केली होती. म्हणून ठाणे कोर्टानं 29 आरोपींपैकी एक असलेल्या आणि दाऊदचा साथीदार तारिक परवीन याला परवा जामीन मंजूर केला होता. यात पोलीसचं परमबीर सिंह यांना वाचवत आहेत, असा आरोप तक्रारदारांनी केला होता. असं असलं तरी, सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंहांना अटकेपासून 6 डिसेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. असं असलं तरी पोलिसांनी आरोपपत्रच दाखल केलेलं नाही, असं सांगत ते न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात. 


न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह काल (शुक्रवारी) मुंबई पोलिसांपुढे हजर झाले होते. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांवर गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली आहे. गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंहांनी त्यांच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळल्याची माहिती समोर येत आहे. 


न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल अशी एक्सक्लुझिव्ह माहिती परमबीर सिंहांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली. परमबीर सिंह यांची गुन्हे शाखेने चौकशी केली असली तरी त्यांच्यावर इतरही काही आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रकरणांमध्येही परमबीरांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. 


न्यायालयाने फरार घोषित केलं होतं


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं होतं. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 


दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप


परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी केलाय. परमबीर यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल कुठेतरी लपवून ठेवला होता, असा आरोपही शमशेर पठाण यांनी केलाय. या प्रकरणांचा तपास करण्याची मागणी शमशेर पठान यांनी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :