एक्स्प्लोर

वादग्रस्त लेखाप्रकरणी अभिनेता कमल हसन विरोधात जनहित याचिका दाखल

अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त लेखाप्रकरणी त्याच्याविरोधात जनहित याचिका वाराणसीत दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शिवपूरमधील वकील कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

वाराणसी : अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त लेखाप्रकरणी त्याच्याविरोधात जनहित याचिका वाराणसीत दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शिवपूरमधील वकील कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्रिपाठी यांनी कमल हसनच्या तामिळ साप्ताहिकात प्रकाशित लेखावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच हिंदू संघटनांना दहशतवादी संघटना संबोधल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. स्थानिक न्यायालयाने ही याचिक दाखल करुन घेतली असून, या प्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनचा नुकताच तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये एक लेख प्रकाशित झाला. या लेखात त्याने उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळत असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या या लेखावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक राकेश सिन्हा यांनी कमल हसनने जाहीर माफी मागवी, अशी मागणी केली होती. तर भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही कमल हसनवर टीकेची झोड उठवली होती. दुसरीकडे अखिल भारतीय हिंदू महासभेने कमल हसनला गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, कमल हसनने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, हिंदुत्ववादी संघटनावर निशाणा साधला आहे. “जर आम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत असून, तर ते आम्हाला देशद्रोही ठरवतात. त्यानंतर आम्हाला अटक करुन तुरुंगात पाठवलं जातं. पण आता तुरुंगातही जागा नसल्याने, ते आता थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा करत आहेत.” संबंधित बातम्या 'हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळतोय', कमल हसनचा वादग्रस्त लेख

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget