Car Bought With Coins Of Rs 10 : धर्मापुरी, तामिळनाडू येथील एका कार डीलरच्या कर्मचार्‍यांना मोठे आश्चर्य वाटले जेव्हा एक व्यक्ती कार खरेदी करण्यासाठी 10 रुपयांची नाणी भरलेले पोते घेऊन शोरूममध्ये आला. अखेर 10 रुपयांच्या नाण्यांनी त्याने 6 लाखांची कार खरेदी केलीच. 


10 रुपयांच्या नाण्यांनी अखेर खरेदी केली 6 लाखांची कार! 
अरूरच्या वेट्रीवेलने सांगितले की त्याची आई दुकान चालवते आणि ग्राहक 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देतात. अशा स्थितीत त्यांच्या घरी त्या नाण्यांचा मोठा ढीग आढळून आला. त्यामुळे या नाण्यांच्या साहाय्यानेच कार घेण्याचे त्याने ठरवले.वेट्रीवेलने सांगितले की, एके दिवशी लहान मुलं 10 रुपयांच्या नाण्यांशी खेळत असल्याचे आढळले. त्यामुळे मी केवळ 10 रुपयांची नाणी देऊनच कार खरेदी करणार असल्याचे ठरवले. वेट्रिवेलने सुमारे एका महिन्यात प्रत्येकी 10 रूपयांची 60,000 नाणी गोळा केली, असे एकूण एकूण 6 लाख रुपये जमले. डीलरशिप सुरुवातीला संकोच करत होत्या. पण वेट्रीवेलची जिद्द पाहून त्यांनी होकार दिला.


बँकेचाही नाणी घेण्यास होता नकार,
वेट्रीवेल म्हणतात, की नाणी घ्यायला कोणी तयार नव्हते. बँकांनी सांगितले की, त्यांच्याकडे इतके पैसे मोजण्यासाठी लोक नाहीत. रिझर्व्ह बँकेने नाणी निरुपयोगी असल्याचे सांगितले नसतानाही बँका ती का स्वीकारत नाहीत? तक्रार करूनही कारवाई होत नाही. वेट्रिवेल म्हणाले. वेट्रीवेल आपल्या नातेवाईकांसह 10 रुपयांच्या नाण्यांच्या पोत्या घेऊन शोरूममध्ये गेले, तेथील कर्मचाऱ्यांनी पैसे मोजून गाडीच्या चाव्या दिल्या.


कार शोरूमच्या मालकानेही नाणी घेण्यास नकार
वेट्रिवेलने सुमारे महिनाभर 10 रुपयांची नाणी जमा करून 6 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर तो तामिळनाडूतील धर्मापुरी येथे असलेल्या कार शोरूममध्ये पोहोचला.
येथे त्याने प्रथम कार पसंत केली आणि नंतर नाण्यांमध्ये पैसे देण्यास सांगितले. शोरूमच्या मालकाने सुरुवातीला हा करार करण्यास नकार दिला असला तरी, वेट्रिवेलचा आग्रह आणि आवड पाहून शेवटी कार शोरूमच्या मालकानेही ते मान्य केले.


अशाप्रकारे ही पहिलीच घटना नाही..
अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी एका व्यक्तीने प्रत्येकी 1 रुपयांच्या नाण्यांसह दुचाकीसाठी अडीच लाख रुपये दिले होते. त्यांनी सुमारे तीन वर्षांत ही नाणी गोळा केली आणि ही नाणी मोजण्यासाठी बाईक शोरूमच्या कर्मचाऱ्यांना 10 तास लागले. त्याचप्रमाणे एका रोजंदारी मजुराने आपल्या कुटुंबासाठी एक, दोन, पाच आणि 10 च्या नाण्यांनी स्कूटर खरेदी केली.


महाराष्ट्रातील बहुतांश भागात 10 रुपयांच्या नाण्यावर अघोषीत बंदी
 दहा रुपयाचे नाणे राज्यासह, महाराष्ट्रातील बहुतांश भागात चलनात असल्याचे दिसून येते, मात्र मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येते. तर हे नाणे बंद झाल्याचे कोणतेही आदेश रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाने दिले नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. मात्र शहरातील व परिसरातील दुकानदार सदर नाणे स्वीकारण्यास नकार देतात, तर हे नाणे त्यांच्याकडून ही कोणी स्वीकारत नाही. अनेकांकडे दहा रुपयाचे नाणे असूनही ते तसेच पडून आहेत. काही जणांनी तर ही नाणी चक्क मोडीत दिल्याचे प्रकार पहावयास मिळतात. राजमुद्रेचा सुरू असलेल्या अवमानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दहा रुपयाच्या नाण्यांचे परिसरात चलनच बंद झाले आहे.


बॅंकेचे आवाहन


दरम्यान, मुंबई, औरंगाबाद, नाशिकसह देशभर विविध ठिकाणी 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे, सामान्य ग्राहकांसह व्यापारीही गोंधळून गेले होते. विशेष म्हणजे नाणे बंद झाले नसल्याबाबत रिझर्व्ह बँकने  स्पष्टीकरण दिले, तरीही गोंधळ कायम होता. दहा रुपयाचे नाणे चलनात असून ते सर्व दुकानदारांनी व ग्राहकांनी स्वीकारावे, अशा सूचनांचे फलक सर्व बँकांनी व पतसंस्थांनी आपापल्या बँकेत लावल्यास ग्राहकांमधील गैरसमज दूर होईल असे मत काहींनी व्यक्त केले आहे. दहा रुपयाची नाणी हे रिझर्व बँकेने जारी केलेले कायदेशीर टेंडर आहे आणि ते स्वीकारण्यास नकार देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. वीस रुपयाची नाणी चलनात आहे, ते मात्र व्यवहारात स्वीकारले जात आहेत.मात्र काही दिवसांनी या नाण्याची हीच गत होण्याची शक्यता बाळगून आतापासूनच हे नाणे घेण्याचे टाळले जात आहे, त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. दहा रुपयाचे नाणे हे चलनात असून याबाबत प्रशासनाने वृत्तपत्रातून वारंवार खुलासा दिला आहे. ग्राहकांनी ते घ्यावे असे आवाहनही केले आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या: 


काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, अग्निपथ योजनेसह 'हा' मुद्दा केला उपस्थित


Priyanka Gandhi : जंतरमंतरला जाणाऱ्या काँग्रेस समर्थकाला पोलिसांनी पकडले, तर प्रियांका गांधींनी 'असे' काही केले की.., Video Viral