Priyanka Gandhi Video Viral : काँग्रेस (Congress) नेत्या प्रियांका गांधी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये प्रियांका यांनी काँग्रेस समर्थकाला पोलिसांपासून वाचवले आणि त्याला आपल्या कारमध्ये बसवले. प्रियंका यांनी जंतरमंतरच्या दिशेने जात असताना पोलिसांकडून त्या समर्थकाला पकडून घेऊन जाताना पाहिले, तेव्हा प्रियांका यांनी त्यांची कार थांबवून त्या समर्थकाची पोलिसांपासून सुटका केली आणि नंतर त्याला आपल्या कारमध्ये बसवले. काय घडले नेमके?


काँग्रेस पक्षाचा विरोध
प्रियांकाने पोलिसांना या कामगाराला सोडण्यास सांगितले, ज्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर काँग्रेस समर्थकाने पोलिसांचा हात सोडला आणि प्रियांका यांच्या गाडीकडे जाऊ लागला नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधींबाबत ईडीच्या तपासाला काँग्रेस पक्ष सध्या विरोध करत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची सोमवारीही चौकशी होणार असून ते ईडी कार्यालयातही पोहोचले आहेत. ईडी सोमवारी चौथ्यांदा राहुल गांधींना प्रश्नोत्तरे करणार आहे.


 






 


'अग्निपथ'वर काँग्रेसचा सत्याग्रह


यासोबतच केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेबाबत काँग्रेस पक्ष सत्याग्रह करणार आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी सांगितले की, आज आम्ही जंतरमंतरवर सत्याग्रहाला बसणार असून, सायंकाळी पाच वाजता राष्ट्रपतींची भेट घेऊन अग्निपथ योजना मागे घेण्याची मागणी करणार आहोत. या योजनेवर तरुण आणि संसदेत आधी चर्चा व्हायला हवी होती, पण त्याआधी ती मागे घ्यायला हवी. आमच्या खासदाराचा कसा छळ झाला आणि ईडीचा कसा गैरवापर होत आहे हेही आम्ही राष्ट्रपतींना सांगू, असे माकन म्हणाले.