Ashwini Vaishnaw on BSNL :    आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत  मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात 4 जी सेवा देण्याचा निर्णय  घेतला असून त्यासाठी 26 हजार 316 कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राने  दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.


या विषयी माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले, ग्रामीण भागात देखील 4 जी नेटवर्क मजबूत करणार  आहे त्यासाठी सरकारने 25  हजार गावांसाठी 26 हजार 316 कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. सीमावर्ती भागातील गावात तसेच रिमोट एरियामध्ये देखील लवकरच 4 जी सेवा येणार आहे.


बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी


बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी  निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राकडून बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड) मर्जरला देखील हिरवा कंदिल देण्यात आला आहे. 


केंद्राकडून बीएसएनएलला आवश्यक ते स्पेक्ट्रम देण्यात येणार


अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राकडून बीएसएनएलला आवश्यक ते स्पेक्ट्रम देण्यात येणार आहे. तसेच   4 जी सेवेचा प्रसार करण्यासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा होणार आहे. ग्रामीण भागात देखील 4 जी नेटवर्क मजबूत करणार आहे त्यासाठी सरकारने 25  हजार गावांसाठी 26 हजार 316 कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. सीमेवरील गावांसाठी देखील हे आदेश दिले आहेत.






सीमवर्ती भागात 4 जी सेवा


तसेच सीमेवर असणाऱ्या लडाखमध्ये देखील 4 जी सेवा आणली जाणार आहे. रक्षा मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कम्युनिकेशन मंत्रालय सीमावर्ती भागात 4 जी  सेवा कशी आणता येईल याविषयी मार्गदर्शन करतील.