ABP News C-Voter Survey : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. दोन्ही राज्यामध्ये प्रचारानं वेग घेतला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर पुढील आठवड्यात गुजरात विधनसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. भाजप, आप आणि काँग्रेस या पक्षानं निवडणुकींची जोरदार तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान नेत्यांकडून अश्वासनं आणि वक्त्यांचा पाऊस पडत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहे. दोन्ही राज्यातील प्रचार वेगात सुरु असतानाच एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं साप्ताहिक सर्वे केला आहे.
नोटांवर लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असावा, असं वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर देशभरातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. देशातील राजकारण ढवळून निघालं होतं. याच केजरीवाल यांच्या वक्तव्यावर सी व्होटरनं गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये गुजरातमधील 1425 जणांनी तर हिमाचल प्रदेशमधील एक हजार 361 जणांनी सहभाग नोंदवला आहे. या सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस-मायनस तीन ते पाच टक्के असू शकतो. नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य? असा प्रश्न सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. यावर जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 45 टक्के लोकांनी केजरीवाल यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. तर 55 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.
नोटांवर लक्ष्मी-गणेश या देवतांचा फोटो लावण्याची केजरीवाल यांची मागणी योग्य की अयोग्य?
बरोबर – 45 टक्के
चुकीची मागणी - 55 टक्के
अरविंद केजरीवाल काय म्हणाले होते?
गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केली. भारतीय चलनी नोटांवर (Currency Note) राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासोबतच श्रीगणेश (Ganesh) आणि लक्ष्मी (Laxmi) यांच्या प्रतिमा मुद्रित कराव्यात, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. अरविंद केजरीवालांच्या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागलेत. आणि यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.
नोट- abp न्यूजसाठी सी व्होटरनं सर्व्हे केला आहे. यामध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते पाच टक्के आहे. सर्व्हेचा निकाल लोकांच्या कौल काय यावर अधारित आहे. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही.