UGC Issued Notice : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पीएचडी  करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (PHD Student ) एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहावे असे आवाहन यूजीसीकडून नोटीसीद्वारे करण्यात आले आहे.  एज्युटेक कंपन्यांनी परदेशी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने ऑफर केलेल्या ऑनलाइन पीएचडी प्रोग्रामच्या जाहिरातींद्वारे पीएचडीच्या विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.  "कोणत्याही परदेशी शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने एज्युटेक कंपन्यांच्या ऑनलाइन कार्यक्रमांच्या जाहिरातींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये.  या ऑनलाइन कार्यक्रमांना यूजीसीची मान्यता नाही, असे यूजीसीने जारी केलेल्या नोटीसीमध्ये म्हटले आहे.

  


ऑनलाइन पीएचडी अभ्यासक्रमांपासून सावध रहावे असे विद्यापीठ आयोगाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वतःची कार्यपद्धती आधीपासूनच आहे. यूजीसीकडून पीएचडी पदवी  2016 च्या नियमावलीनुसार दिली जाते. सर्व भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांना (HEIs) पीएचडी पदवी प्रदान करण्यासाठी यूजीसीच्या नियमांचे आणि त्यातील सुधारणांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे आयोगाने म्हटले आहे.   


विद्यापीठ आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.  UGC विद्यार्थ्यांना विदेशी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने एज्युटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या ऑनलाइन पीएचडी प्रोग्रामच्या जाहिरातींद्वारे दिशाभूल न करण्याचा सल्ला देते, असे ट्विटमध्ये यूजीसीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.  






 

ओपन, दूरशिक्षण ( डिस्टन्स) आणि ऑनलाइन मोडवर एम.फिल आणि पीएचडीवर बंदी 


आयोगाने राजी केलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, ओपन आणि डिस्टन्स लर्निंग म्हणजेच दूरशिक्षण केंद्र आणि ऑनलाइन मोडद्वारे सर्व विषयांमध्ये एम.फिल व पीएचडी कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.  अशा ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना यूजीसीची मान्यता नाही. यापूर्वी देखील UGC ने ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाइन मोड अंतर्गत ऑफर करण्यास मनाई असलेल्या प्रोग्रामची यादी जारी केली होती.


महत्वाच्या बातम्या


Medical Education : आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'या' शाखांचा समावेश 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI