Indian Automobile Industry: भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (Indian Economy) आहे. वाहन उद्योगाची भूमिका येथे महत्त्वाची असून, त्याला जगात प्रथम क्रमांकावर आणण्याच्या योजनेवर मोदी सरकार काम करत आहे, असं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत. ते म्हणाले, "2024 च्या अखेरीस आपले रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेसारखी असेल."


नितीन गडकरी यांनी सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याबाबतही भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, आम्हाला सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन द्यायचे आहे. आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. येत्या 5 वर्षात आपण ऑटो मोबाईलचे हब बनणार आहोत. ते म्हणाले की, आता आपली आयात जास्त झाली आहे. त्यामुळे आयात कमी करण्याची गरज आहे. आपल्या मंत्रालयाच्या कामाचे कौतुक करताना गडकरी म्हणाले की, "आम्ही देशभरात रस्ते बनवत आहोत, त्यामुळे लोक वाहने खरेदी करत आहेत."


Indian Automobile Industry: 'भारत लवकरच ऊर्जा निर्यातदार होईल'


नितीन गडकरी म्हणाले आहेत की, लवकरच पेट्रोल, डिझेल आणि इथेनॉल या दोन्हीची सरासरी समान असेल. ते म्हणाले, “आमची लॉजिस्टिकची किंमत सध्या खूप जास्त आहे, 60% च्या जवळ आहे, पण आम्ही ती एका अंकावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत.” ते म्हणाले, “आम्हाला माहित आहे की, हायड्रोजनची किंमत 300 रुपये प्रति किलो आहे, पण लवकरच 100 रुपये प्रति किलो असेल आणि आपला देश लवकरच ऊर्जा निर्यातदार होईल.''


Indian Automobile Industry: '5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करू'


गडकरी म्हणाले, “आपल्याला अशा नेतृत्वाची गरज आहे जे आपत्तीचे संधीत रूपांतर करू शकेल आणि आता आपल्याकडे असे नेतृत्व आहे. 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी ऑटो-मोबाइल उद्योग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.'' गडकरी म्हणाले की, ''वाहन उद्योग देशात 4.5 कोटी रोजगार उपलब्ध करून देतो. याची व्याप्ती येथे आणखी वाढेल.''


रस्ता सुरक्षेबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ता सुरक्षाही महत्त्वाची आहे. देशात 5 लाख अपघात आणि 1.5 लाख मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2024 पर्यंत ही संख्या निम्म्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणाले, "सर्व कंपन्यांना सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.''