Coronavirus in India Today : देशात आज 197 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच सध्या दोन हजारांहून अधिक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BF.7 आणि XBB 1.5 या व्हेरियंटचा संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरियासह अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशात खबरदारी बाळगली जात आहे.


देशात 2309 कोरोना रुग्ण उपचाराधीन


भारतात सध्या 2309 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात गेल्या 24 तासांत 197 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा 4,46,80,583 वर पोहोचला आहे. यातील चार कोटीहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच पाच लाख तीस हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.


परदेशातून आलेले 200 हून अधिक प्रवासी कोरोनाबाधित


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध विमानतळांवर आतापर्यंत 15 लाखांहून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 200 हून अधिक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण BF.7 व्हेरियंटचे आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या त्यांच्या नमुन्यांमध्ये अनेक प्रवाशांमध्ये BF.7 व्हेरियंट आढळल्याचे दिसून आले.






220 कोटी लसींचा टप्प पूर्ण


देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 220 कोटीहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आरोग्य प्रशासनाकडून सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. नागरिकांना बूस्टर डोस घेण्याच आवाहन केले जात आहे.


कोरोनाची लक्षणे बदलली, 'ही' आहेत नवीन लक्षणे


शास्त्रज्ञांच्या नव्या रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये लक्षणे बदलली आहेत. यामध्ये काही लक्षणे पूर्वीप्रमाणे सारखीच होती, तर काही नवीन लक्षणे आढळून आली आहेत. घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा येणे, शिंका येणे, रात्री घाम येणे ही नवीन लक्षणे आढळली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या