एक्स्प्लोर

‘बंच ऑफ थॉट्स’चे विचार तत्कालीन, आता संयुक्तिक नाहीत : भागवत

अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ज्यांच्या मार्गदर्शनानं पुढे गेली, त्या डॉ. गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकापासून संघानं पहिल्यांदाच स्वतःला दूर केलंय. त्या पुस्तकातले संदर्भ तत्कालीन होते, ते विचार आता संयुक्तिक नाहीत, असे दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं. काल दिल्लीत ते बोलत होते. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. काल त्याचा शेवटचा दिवस होता. ‘बंच ऑफ थॉट्स’वर मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? “बंच ऑफ थॉट्समधील विचार परिस्थितीजन्य, त्यावेळच्या प्रसंगांच्या संदर्भात आहेत. त्या गोष्टी शाश्वत राहत नाहीत. मात्र, गुरुजींचे जे शाश्वत विचार आहेत, त्यांचं संकलन करुन ‘श्री गुरुजी : व्हिजन अँड मिशन’ पुस्तक प्रसिद्ध कले आहे. त्यामध्ये तत्कालीन सर्व गोष्टी वगळून सर्व काळासाठी उपयुक्त विचार ठेवण्यात आले आहेत. ते तुम्ही वाचा. त्यामधून सर्व गोष्टी तुम्हाला कळून जातील.”, असे मोहन भागवत म्हणाले. याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण, एससी-एसटी अॅक्टसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. भागवत नेमकं काय म्हणाले आरक्षणावर? “सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे. आता हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचंय, ज्यांना लाभ मिळतोय. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते क्रिमीलेयरचं काय करायचं ते ठरवतील. आरक्षण समस्या नसून, आरक्षणावरील राजकारण ही समस्या आहे. जे खड्ड्यात पडले आहेत, त्यांच्या हातात हात देऊन आपण वर आणलं पाहिजे. एक हजार वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी 100-150 वर्षे झुकून राहावं लागलं, तर ती मोठी गोष्ट नाही. सर्वच आपले आहेत.”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. एससी-एसटी अॅक्टवर काय म्हणाले भागवत? “जी परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कायदा बनवला गेलाय. त्या कायद्याला नीट लागू केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग व्हायला नको. सद्भावना निर्माण करण्याची मोठी गरज आहे. संघाची इच्छा अशीय की, सामाजिक सद्भावाने या गोष्टी सोडवल्या पाहिजेत.”, असे एससी-एसटी अॅक्टवर बोलताना मोहन भागवत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget