एक्स्प्लोर

सपा-बसपा युती अभेद्य राहणार, मायावतींचं स्पष्टीकरण

राज्यसभा निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराच्या पराभवानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजवर जोरदार हल्ला चढवला

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराच्या पराभवानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच, या निकालानंतरही सपा आणि बसपामधील युती अभेद्य राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. राज्यसभेच्या निवडणूक निकालानंतर मायावतींनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजपवर मतं फोडल्याचा आरोप केला. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करुन, आमदारांना धमकावण्यात आले, आणि अनिल अग्रवाल यांना विजयी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेस्ट हाऊसकांडचा उल्लेख करुन मायावती म्हणाल्या की, “ सध्या भाजपकडून 2 जून 1995 च्या गेस्ट हाऊसकांडाची आठवण करुन दिली जात आहे. वास्तविक, हे हत्याकांड म्हणजे षडयंत्र होतं. या घटनेतील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या पदावर बढती देऊन भाजपला काय सिद्ध करायचं आहे? त्यांना आमचीदेखील हत्या करायची आहे का?” असा थेट सवाल मायावतींनी यावेळी योगी सरकारला विचारला. सपा-बसपा युती अभेद्य रहाणार असल्याचं स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, “फुलपूर आणि गोरखपूरमधील पराभवाची त्यांना (भाजपला) धडकी भरली आहे. यामुळेच भाजपने राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी जीवाचं रान केलं. जेणेकरुन बसपा आणि समाजवादी पक्षाची जवळीक कमी करता येईल.” “राज्यसभा निवडणुकीतील कालच्या निकालानंतर समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यातील युतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे भाजप आणि कंपनीने युती तोडण्याचे प्रयत्न करु नयेत.” असा इशाराही मायावतींनी यावेळी दिला. तसेच, भाजप, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर करत असल्याचाही आरोप मायावतींनी यावेळी केला. पण तरीही आमच्या आमदारांनाही कशाचीही भीती न बाळगता मतदान केले. केवळ एकाच आमदाराने क्रॉस वोटिंग केलं, त्या आमदाराला आम्ही पक्षातून निलंबित केल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मायावती म्हणाल्या की, “भाजपने जाणूनबुजून आपला एक उमेदवार अनिल अग्रवाल यांच्या रुपाने निवडणुकीत उतरवला होता. वास्तविक, भाजपची ही जुनी खेळी आहे. ते पैशांचा नेहमी वापर करतात. दहव्या उमेदवारामुळेच आमदारांची मतं फोडणं शक्य झालं.” दरम्यान, काल  राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं. यूपीमधील पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवाचा वचपाच सत्ताधारी भाजपने काढला. यूपीशिवाय पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली. संबंधित बातम्या राज्यसभा निवडणूक : यूपीमध्ये भाजप 10 पैकी 9 जागांवर विजयी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडेElection Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
Embed widget