एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानचा आणखी एक धोकादायक कट उधळला; BSF ने कठुआ जिल्ह्यात शोधला बोगदा

बीएसएफच्या म्हणण्यानुसार गेल्या सहा महिन्यांत बोगदा सापडण्याची ही चौथी वेळ आहे. 13 जानेवारीला त्याच सेक्टरच्या बोबियान गावात 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता.

कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला आणखी एक भूमिगत बोगदा सापडला आहे. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मार्फत घुसखोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) आणखी एक भूमिगत बोगदा तयार केल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, हा गुप्त बोगदा हिरानगर सेक्टरच्या पानसर भागात सीमा चौकीवर कारवाई दरम्यान सापडला आहे.

गेल्या दहा दिवसांत बीएसएफला हिरानगर सेक्टरमध्ये अशा प्रकारचा दुसरा भूमिगत बोगदा सापडला आहे. सांबा व कठुआ जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांतील हा चौथा बोगदा आणि गेल्या दशकातील दहावा आहे. विशेष म्हणजे, याच सेक्टरच्या बोबियान गावात 13 जानेवारीला 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा नवीन बोगदा पाकिस्तानच्या बाजूने 150 मीटर लांबीचा आणि सुमारे 30 फूट खोल आणि तीन फूट व्यासाचा असल्याचे समजते.

पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना भारतात पाठवून घातपात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानचं कोणतंही षडयंत्र पूर्ण होऊ दिलं नाही.

भारतीय सुरक्षा रक्षकांच्या चोख बंदोबस्तामुळे पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत आहे. काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती की आता पाकिस्तानचे दहशतवादी गट जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागात ऑनलाइन भरतीत गुंतले आहेत. मात्र, याबाबतही भारतीय जवान सावध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Embed widget