Britain India : इंग्रजांनी जगभरातील अनेक देशांवर राज्य केलं. भातरतावर देखील जवळपास 150  वर्षे राज्य केलं. या 150 वर्षात इंग्रजांकडून भारतीयांवर अमानुष अत्याच्यार करण्यात आल्याचे लाखो उदाहणे आहेत. इंग्रजांच्या दुलमी राजवटीतून 1947 ला भारत स्वंतत्र झाला. परंतु, त्याआधी त्यांनी आपल्या हुकुमशाही राजवटीने भारतीयांना नाहक त्रास दिला. हिंसा, वर्णभेदासह भारतीयांचे आर्थिक शोषण केले. ब्रिटनच्या जाचक धोरणांमुळे आणि कायद्यांमुळे अवघ्या 40 वर्षांत दहा कोटींहून अधिक भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. यावरून ब्रिटिश राजवट किती भयंकर होती, याची कल्पना येते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.


ऑस्ट्रेलियातील डायलन सुलिव्हन आणि जेसन हिकल या दोन  अभ्यासकांनी त्यांच्या संशोधनातून ब्रिटिश वसाहतवादाचा बुरखा फाडलाय. या संशोधनानुसार 1880 ते 1920 या काळात ब्रिटिशांनी तब्बल दहा कोटी भारतीयांची हत्या केली होती. त्याच काळात सोव्हिएत युनियन, चीन आणि उत्तर कोरियामध्ये दुष्काळामुळे जेवढे लोक मरण पावले, त्यापेक्षा जास्त लोक भारतात ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे मरण पावले होते. यावरून मृतांचा हा  आकडा किती मोठा आहे याचा अंदाज येतो. 
 
"ब्रिटिश राजवटीत भारतातील गरिबी 1810 मध्ये 23 टक्क्यांवरून 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक झाली होती. ब्रिटीशांच्या काळात भारतातील वेतनात मोठी घट झाली होती. 19व्या शतकात वेतन सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखीनच धोकादायक बनली होती, अशी माहिती आर्थिक इतिहासकार रॉबर्ट सी. ऍलन यांच्या संशोधनातून पुढे आली आहे.  


रॉबर्ट सी. ऍलन यांनी यांनी केलल्या दाव्यानुसार, ब्रिटीश राजवटीत भारतातील लोकांना प्रचंड अत्याचार सहन करावे लागले. 1880 ते 1920 दरम्यान ब्रिटनची दडपशाहीचे धोरण अत्यंत क्रूर होती. हा काळ भारतासाठी विनाशकारी होता. 1880 च्या दशकात ब्रिटिशांनी भारतात मोठ्या प्रमाणावर जनगणना सुरू केली. त्यातून एक भयावह चित्र समोर येते. 1880 च्या दशकात भारतात प्रति 1000 लोकांमागे 37 मृत्यू होत होते. 1910 मध्ये हा आकडा 44 पर्यंत वाढला.  
वर्ल्ड डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील एका पेपरमध्ये 1880 ते 1920 या चार दशकांमध्ये ब्रिटिश दडपशाही धोरणांमुळे मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी जनगणना डेटा वापरण्यात आलाय.  भारतातील मृत्यूची आकडेवारी 1880 पासूनच उपलब्ध आहे. 


इंग्रज राजवटीच्या आधी भारतीय लोकांचे जीवनमान पश्चिम युरोपच्या विकसनशील भागातील लोकांसारखे होते.  आकडेवारीच्या कमतरतेमुळे ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात मृत्यूचे प्रमाण किती होते याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. परंतु, 16 व्या आणि 17 व्या शतकात इंग्लंडमध्ये मृत्यू दर हजार लोकांमागे 27.18 मृत्यू होता. 16 व्या आणि 17 व्या शतकात भारतातील मृत्यूदर इंग्लंडप्रमाणेच होता असे गृहीत धरले तर 1881 ते 1920 या काळात भारतात  तब्बल 16 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. 
 
निर्यातदार देशाला आयातदार बनवले


एकेकाळी भारत हा जगातील सर्वात मोठा औद्योगिक उत्पादक देश होता. भारतातून उत्तम दर्जाचे कपडे जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यात केले जात होते. 1757 मध्ये बंगालचा ताबा घेतल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू त्याचा नाश करायला सुरुवात केली. त्यानंतर भारतात राजवट स्थापन केल्यानंतर ब्रिटनने भारताचे उत्पादन क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त केले. इंग्रजांनी भारतीय शुल्क व्यावहारिकरित्या रद्द केले. त्यामुळे भारतातील देशांतर्गत बाजारपेठेत ब्रिटिशांचा माल मोठ्या प्रमाणात दाखल झाला. दुसरीकडे इंग्रजांनी भारतात जास्त कर आणि शुल्क लादून भारतीयांना त्यांच्याच देशात कापड विकण्यापासून रोखले. इंग्रजांनी भारतातील बड्या उत्पादकांना या भेदभावपूर्ण व्यापार व्यवस्थेने चिरडून टाकले आणि भारतातील उद्योगधंदे अतिशय प्रभावीपणे उद्ध्वस्त केले. आपल्या क्रूर नितीने एकेकाळी निर्यातदार असणाऱ्या भारत देशाला इंग्रजांनी आयातदार बनवले. 
 
भारतीय अर्थव्यसस्थेच्या चिंधड्या


भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाली तेव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 23 टक्के होता. परंतु, इंग्रांनी भारत सोडला त्यावेळी हा आकडा अवघ्या चार टक्क्यांवर आला होता. जगाला दर्जेदार कपडे निर्यात करणारा भारत आता आयात करणारा देश बनला होता. ज्या उद्योगात भारत जगाच्या 27 टक्के योगदान देत होता, तो 2 टक्क्यांच्या खाली आला.


पहिल्या महायुद्धात भारतीय संसाधनांचा जबरदस्तीने वापर


पहिल्या महायुद्धातील काही आकडेवारीवरून ब्रिटिशांनी भारतीयांचे किती शोषण केले हे समजू शकते. पहिल्या महायुद्धावेळी भारताला गरिबी आणि आर्थिक मंदीचा फटका बसला होता. असे असूनही या युद्धात भारताचा मोठा पैसा ब्रिटिशांनी वापरला. या युद्धात लढलेला ब्रिटिश सैन्यातील प्रत्येक सहावा सैनिक भारतीय होता. या युद्धात 54 हजारांहून अधिक भारतीय जवान शहीद झाले आणि सुमारे 70 हजार भारतीय जवान जखमी झाले.