नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला ब्लॅक लिस्ट करा, अशा मागणीचा प्रस्ताव फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटननं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसमोर मांडला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहर आणि त्याच्या  जैश ए मोहम्मद या संघटनेवर बंदी घालण्यासाठी भारताकडून की बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला ब्लॅक लिस्ट करा



आता या प्रयत्नाला अमेरिका, फ्रांस आणि ब्रिटनची साथ मिळाली आहे. या तिन्ही शक्तिशाली देशांनी आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैशचा प्रमुख मसूद अजहरवर बंदीचा नवा प्रस्ताव दिला आहे. मसूद अजहरची संपत्ती जप्त करणे, शस्त्र बंदी आणि प्रवासबंदी घालण्याची मागणी या देशांनी केली आहे. 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेमध्ये हा प्रस्ताव ठेवला गेला. या प्रस्तावात पुलवामा हल्ल्याचा देखील उल्लेख केला आहे.

दुसरीकडे स्वित्झर्लण्डमधील जीनिव्हातील मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत देखील भारत सरकारने हा मुद्दा उचलून धरला आहे. दहशतवाद मूलभूत मानवाधिकाराचे सर्वाधिक घातकी उल्लंघन आहे. परिषदेकडून यावर कडक कारवाई केली जावी, असे या परिषदेत भारताने सांगितले.

भारताने म्हटले आहे कि, पाकिस्तानने 2004 साली आम्ही आमच्या भूमीत दहशतवादाला थारा देणार नाही असे सांगितले होते, या आश्वासनाला त्यांनी जागले पाहिजे. पाकिस्तानने दहशतवादी संगठनांवर कारवाई करायला हवी, असेही भारताकडून या बैठकीत सांगण्यात आले.
 VIDEO | आसुरी आनंद मिळालेल्या जैशच्या डोळ्यात आसू | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा