नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांची तळं उध्वस्त करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामाच्या घटनेत शहीद झालेल्या जवानांचा  कारवाईचे देशभरातून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात 'मिराज' विमानाने  महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अजमेरमध्ये एका जोडप्याने त्यांच्या नवजात मुलाचे 'मिराज' असे ठेवले आहे.


VIDEO | भारताच्या एअर स्ट्राईकचा हिरो... 'मिराज 2000' | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



सोमवार रात्री भारतीय वायु सेनेचे फायटर विमान मिराजद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. जेंव्हा बालाकोटमध्ये पहाटेच्या सुमारास हल्ला केला जात होता तेंव्हाच नागौर जिल्ह्यातील डाबडा गावातील रहिवासी महावीर सिंह यांच्या पत्नींना प्रसूती कळा सुरु झाल्याने हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. याचवेळी त्यांना मुलगा झाला. त्यांनी या मुलाचे नाव मिराज असे ठेवले आहे.

महावीर सिंह यांचा एक भाऊ भूपेंद्रसिंह भारतीय वायुदलात कार्यरत आहेत तर दुसरे भाऊ श्रवणसिंह हा माजी सैनिक आहेत. भारतीय सेनेमधील माजी सैनिक श्रवणसिंह यांनी आपल्या भावाच्या मुलाचे नाव मिराज फायटर विमानाच्या नावावरून ठेवले आहे.

मिराज या नावावरून आम्हाला भारतीय वायुसेनेच्या या पराक्रमाची आठवण आयुष्यभर येत राहील. माझा मुलगा मोठा होऊन भारतीय सेनेत जावा अशी इच्छाही महावीर सिंह यांनी बोलून दाखवली.