Breaking News LIVE : महाराष्ट्रासाठी दिलासादायक वृत्त, मान्सून राज्यात दाखल

Breaking News LIVE Updates, 05 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jun 2021 02:19 PM
राज्यात आज 13659 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 21776 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आज 13659 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 21776 रुग्ण कोरोनामुक्त, तर आज 300 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद

महाराष्ट्रासाठी दिलासादायक वृत्त, मान्सून राज्यात दाखल

महाराष्ट्रासाठी दिलासादायक वृत्त असून  दोन दिवसांपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सून राज्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 

आमच्या मनात पाप नाही, मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट - संजय राऊत

आमच्या मनात पाप नाही, मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचं काम अगदी व्यवस्थित सुरु असल्याचंही वक्तव्य केलं. 

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट असल्याचं समोर आलंय. बनावट अकाऊंटवरून अनेकांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून सायबर पोलिसांकडून बनावट अकाऊंट बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

ब्रेक द चेन च्या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचा अधिकार महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना


राज्य सरकारने जाहीर केलेली ब्रेक द चेन च्या नियमावलीचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्याचा अधिकार महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना असेलया नियमावलीच्या आधारे आपण कोणत्या लेव्हलला आहोत हे स्थानिक स्वराज्य संस्था ठरवतील त्यानुसार नियम जारी करतील. सोमवार ते रविवार हे नियम लागू राहतील. दर शुक्रवारी आढावा घेऊन लेव्हल ठरवली जाईल आणि त्याप्रमाणे नियमांचं पालन केल जाईल.

सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआय मध्ये नवा ड्रेस कोड लागू

सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआय मध्ये नवा ड्रेस कोड लागू केला असून जीन्स, टी-शर्ट, चप्पल, स्पोर्ट शूज घालून ऑफिसला यायचं नाही असा नियम करण्यात आला आहे. पुरुषांसाठी कॉलर शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स फॉर्मल शूज तर स्त्रियांसाठी साडी, सूट फॉर्मल शर्ट आणि ट्राउझर्स असा ड्रेस कोड आहे. सीबीआयच्या कामामध्ये व्यावसायिकता दिसावी यासाठी हा बदल केल्याचं म्हटले आहे. याआधी सीबीआयमध्ये ड्रेस कोड लागू झाला होता तेव्हादेखील महाराष्ट्र कॅडरचे एमजी कात्रे हे संचालक होते..

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी

राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील. ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. 

पार्श्वभूमी

Maharashtra Unlock : 7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी!
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल केले जातील. ही अधिसूचना सोमवारपासून (7 जून) लागू होईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासकीय पातळीवरील या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाईल.


World Environment Day 2021 : यूनोच्या इतिहासात सर्वाधिक महत्व असलेला जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातोय?
आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतोय. हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जातोय. 


world environment day : प्लास्टिकवर बंदी आणून भागणार नाही
प्लास्टिकवर बंदी आणून भागणार नाही हे एव्हाना आपल्याला कळून चुकलंय. कारण आज प्लास्टिक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय. मात्र हे प्लास्टिक पर्यावरणासाठी मात्र घातकच. त्याच योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विघटन होणं जितकं आवश्यक आहे, तितकचं त्याचं विलगीकरणही आवश्यक आहे. 'बिस्लेरी' या नावाजलेल्या कंपनीनं मुंबईत देशातील पहिला पर्यटनस्नेही प्लास्टिक विघटन करणारा प्रकल्प उभारला आहे.


Maharashtra Corona Update: शुक्रवारी राज्यात 14,152 नवे रुग्ण, तर 20,852 डिस्चार्ज, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन लाखांच्या आत
राज्यात शुक्रवारी 14,152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20,852 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच काल 289 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात सध्या एकूण 1,96,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.