BBC Mumbai Delhi Office Income Tax Survey : बीबीसीच्या (BBC) कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी सुरु आहे. मुंबई आणि दिल्लीतील बीबीसी वृत्तसंथ्येच्या कार्यालयात (Income Tax) अधिकारी दाखल झाले आहेत. आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांची टीम बीबीसीच्या कार्यालयात दाखल झाली असून त्यांच्याकडून पाहणी सुरु आहे. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करत आहेत. मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांमध्ये ही पाहणी सुरु आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीसी ऑफिसमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन वापरण्यास मनाई केली आहे. बीबीसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत एकत्र केलं आहे. दरम्यान सध्या आयकर विभागाची टीम कागदपत्रआंची तपासणी करत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आयकर अधिकारी आज बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून बीबीसीच्या वित्त विभागाच्या खात्यातील काही कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. आयकर विभागाने विभागाने खाते आणि वित्त विभागातील (Account of Finance Department) व्यक्तींचे काही मोबाईल फोन आणि लॅपटॉप/डेस्कटॉप जप्त केल्याचं सुत्रांच्या माहितीनुसार सांगितलं आहेत. आयकर अधिकारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बॅकअप घेतील आणि त्या व्यक्तींना परत देतील, असंही एएनआयच्या सुत्रांनी सांगितलं आहे.
बीबीसीची प्रतिक्रिया काय?
दरम्यान, यासंदर्भात बीबीसीने निवेदन जारी करत सांगितलं आहे की, 'आज बीबीसीच्या कार्यालयात आयकर विभागाने पाहणी केली. बीबीसीने ट्रान्सफर प्राइसिंग नियमांचे जाणीवपूर्वक पालन न केल्यामुळे प्राप्तिकर विभागाने बीबीसी कार्यालयाची पाहणी केली. आयकर कायद्याच्या तरतुदींनुसार, अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीला 'सर्वेक्षण' असं म्हणतात, छापेमारी नाही. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण होऊ नये.'
पाहा व्हिडीओ : BBC च्या कार्यालयात प्राप्तिकर विभागाची पाहणी
बीबीसी डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत
दरम्यान, अलीकडे बीबीसी एका वादग्रस्त डॉक्युमेंट्रीमुळे खूप चर्चेत आलं. बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरून संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्रीला प्रोपगंडा म्हटलं. केंद्र सरकारने या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीवर बंदी आणली. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही डॉक्युमेंट्री एकतर्फी दृष्टीकोन दर्शविते, त्यामुळे डॉक्युमेंट्रींच्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्यात आली. मात्र, सरकारच्या बंदीनंतरही अनेक विद्यापिठे आणि महाविद्यालयांमध्ये या डॉक्युमेंट्रींचं स्क्रीनिंग करण्यात आलं. यावरून दिल्लीतील जेएनयूमध्येही मोठा गदारोळ झाला होता.
बीबीसी (BBC) ही लंडन स्थित वृत्तसंस्था आहे जी अनेक वर्षांपासून भारतात पत्रकारिता करत आहे. अलीकडेच, बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगली (2002) वर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली होती, या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :