Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या काळात भारताला G-20 चे नेतृत्व मिळाले आहे. G-20 यशस्वी होत आहे, त्यामुळं त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना मिळायलाच हवं असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांनी केलं. शाह यांनी आज एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election2024) कोणतीही स्पर्धा नाही. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात असल्याचे शाह म्हणाले.
Amit Shah on Naxalism : बिहार आणि झारखंडमधील नक्षलवाद संपला
बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. मला खात्री आहे की, छत्तीसगडमध्येही लवकरच शांतता प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाशी संबंधित सर्व प्रकारची स्थिती चांगली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर-पूर्व आणि देशातील बाकीच्या भागातील लोकांच्या मनातील अंतर संपवलं आहे. ऐकमेकांविषयी आदराची भावना निर्माण झाल्याचे शाह म्हणाले. आमच्या सरकारनं सर्मसमावेशक अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही हिंसाचार संपवला आहे. तसेच अंमली पदार्थांच्या व्यापारावर कडक कारवाई केल्याचे शाह यांनी सांगितले.
शहरांची नावे बदलण्याचा प्रत्येक सरकारला अधिकार
शहरांची नावे बदलण्याबाबत देखील अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारनं खूप विचार करून शहरांची नावे बदलण्याचे निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सरकारला हा अधिकार असल्याचे शाह यावेळी म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाजप नेते अमित शाह म्हणाले की, 2024 मध्ये कोणतीही स्पर्धा नाही, देश मोदींसोबत एकतर्फी पुढे जात आहे. देशातील जनतेने इतर पक्षांना लोकसभेतील विरोधी पक्ष होण्याची देखील सधी दिली नसल्याचे शाह म्हणाले.
संसदेत नियमानुसार चर्चा व्हावी, ती संसदीय भाषेतच व्हावी असंही त्यांनी सांगितले.
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि हिंडेनबर्ग अहवालाबाबत शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मी मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने या विषयावर सध्या काही बोलणे योग्य ठरणार नाही. पण यामध्ये भाजपसाठी लपवण्यासारखे काही नाही, त्यामुळं घाबरण्याचे काही कारण नसल्याचे शाह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: