ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिकणारा हा विद्यार्थी यूकेहून 15 मार्चला कोलकाताला परतला. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्याला बेलेघाटा आयडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला नकार देत तो घरी गेला. लंडनमधील ज्या तीन लोकांसोबत त्याने रुम शेअर केली होती. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. यानंतरही त्याने लोकांमध्ये मिसळणं सुरुच ठेवलं. अधिकारी असलेल्या आपल्या आईला तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालय असलेल्या नबन्ना येथे भेटला. तर, 16 मार्चला शहराच्या मध्यभागी असलेल्या एमआर बांगूर हॉस्पिटलला त्याने भेट दिली. तिथे त्याने अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यास नकार दिला. राज्य आरोग्य विभागाने अखेर त्याला 17 मार्चला बेलेघाटा आयडी रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडले. तिथं त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याचा चालक आणि कुटुंबाला अलग ( quarantine) ठेवण्यात आलं आहे.
Coronavirus | इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू; जगभरातील परिस्थिती गंभीर
ममता बॅनर्जी भडकल्या
या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. सोबतच मुलाला अॅडमिट न केल्याने प्रशासनालाही चांगलेच फटकारलं आहे. एवढी व्यवस्था असताना एखादी व्यक्ती तुमच्या हातून सुटणं हा बेजबाबदारपणा असल्याचे त्या म्हणल्या. नियम सर्वांना सारखेच आहेत. इथं कोणीही जास्त महत्वाचा किंवा कमी महत्वाचा नाही. सर्व सारखेच असल्याचे त्या म्हणाल्या. मी हात जोडून विनंती करते, सर्वांना घटनेचं गांभीर्य पाहून वागा, असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
शेतकऱ्याचा पाय खोलात! आधी कोरोना अन् आता गारपीट
देशात कोरोना रुग्णांची संख्या 150 वर
देशात कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढतच आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल केरळचा नंबर आहे. आज सकाळीच महाराष्ट्रात आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. युकेवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघालीय. तर, उल्हासनगर येथील 49 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झालेली आहे. तो नुकताच दुबईहून आलेला आहे.
Anti Corona Mattress Fake News | अॅंटी कोरोना गादीच्या नावाने लोकांची दिशाभूल, जाहिरातदारावर गुन्हा