Boy falls into rasam vessel: तामिळनाडूतील (TamilNadu) तिरुवल्लुर जिल्ह्यात एका तरुणाच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरम रस्समच्या भांड्यात पडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्‍यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका कॅटरिंग सर्व्हिसमध्ये पार्ट टाईम काम करत होता. तो एका लग्न समारंभात उपस्थित पाहुण्यांना जेवण देत असताना उकळत्या रस्समच्या (Rassam) कढईत पडला. गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला एका शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


महाविद्यालयात शिक्षण घेत असताना हा तरुण एका कॅटरिंग सर्व्हिसमध्ये काम करत होता. याच कॅटरिंग सर्व्हिससाठी तो एका लग्नसमारंभात काम करण्यासाठी पोहचला होता. तमिळनाडू पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण लग्नात आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढत होता. तेव्हा तो उकळत्या रस्सममध्ये पडला. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. उकळत्या रस्सममध्ये पडल्याने त्याचे संपूर्ण शरीर भाजले होते.  23 एप्रिल रोजी तो मिंजूर येथील एका लग्नमंडपात कामावर आला होता.तो स्वयंपाकाच्या भागातून चालत जात असताना घसरला आणि गरम रस्समने भरलेल्या भांड्यात पडला.  तेथील इतर लोकांनी ताबडतोब त्याला मिंजूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सतीशचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. तो कोरुक्कुपेट येथील एका महाविद्यालयात बीसीएच्या अंतिम वर्षाला शिकत होता आणि एका केटरिंग सर्विसमध्ये काम करत होता


पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली असून संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी सध्या सुरु आहे. 


यापूर्वी 'या' राज्यांत झाला होता असा प्रकार


यापूर्वी अशी घटना छत्तीसगढ आणि गोवा या राज्यात देखील झाली होती. छत्तीसगढच्या कांकेर जिल्ह्यातील ही घटना होती. शाळेतील मिड-डे मीलच्या वाटपादरम्यान एका चिमुरडीचा मृत्यू झाला होता. गरम वरणाच्या भांड्यात ही लहान मुलगी पडली होती. संपूर्ण शरीर भाजल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर अशीच एक घटना गोव्यात देखील घडली होती. गरम पाण्याच्या भांड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला होता. 


याआधी घडलेल्या घटना असो किंवा आता घटना असो या सर्व घटना या धक्कादायक आहेत. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.तसेच मुलांनी देखील अशा वेळेस काळजी घेणे महत्त्वाचे आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या 


Wardha : दारूबंदी असलेल्या वर्ध्यात उलटला बीयरचा ट्रक, रस्त्यावर बियरच्या बाटल्यांचा सडा अन् नागरिकांची धावाधाव