BMW X6 in River: बेंगळुरूतील एका व्यक्तीने कथित त्याच्या आईच्या मृत्यूवर 1.3 कोटी रुपयांची BMW X6 SUV श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीत फेकून दिली. जेव्हा त्याने एसयूव्ही नदीत फेकली तेव्हा तो उदास आणि दु:खी होता, असे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर लगेच मच्छीमार आणि प्रवाशांनी कर्नाटकातील श्रीरंगपट्टणातील कावेरी नदीच्या मध्यभागी एक चमकदार लाल लक्झरी SUV बुडताना दिसली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.


पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी कारमध्ये कोणी अडकले आहे का, याची माहिती करून घेण्यासाठी स्कूबा डायव्हर्सना तातडीने पाचारण केले. त्यानंतर कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची खात्री करून गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून ही कार बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची असल्याचे समोर आले आहे. त्या व्यक्तीला नंतर चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र त्या व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, कार मालकाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो डिप्रेशनमध्ये आहे. त्यामुळे त्याने निराश होऊन त्याची बीएमडब्ल्यू एसयूव्ही पाण्यात बुडवण्याचा निर्णय घेतला.


पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवल्यानंतर त्या व्यक्तीला सोडून दिले. तसेच याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पाण्यात फेकून दिलेली BMW X6 SUV बंगळुरूमधील त्याच्या कुटुंबीयांकडे परत आणण्यात आली आहे. BMW X6 SUV ही भारतातील जर्मन लक्झरी कार ब्रँडची सर्वात महाग कार आहे. या मॉडेलची किमती 1.05 कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही कार भारतात आयात केली जाते.


इतर महत्वाच्या बातम्या: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI