एक्स्प्लोर

UP Election 2022 : राकेश टिकैत उत्तर प्रदेशमधील निवडणूक लढवणार?

उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, योग्य वेळ आल्यावर तुम्हाला कळवू असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले.

Rakesh Tikait On UP Election 2022 : पुढच्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लढवण्याबाबत अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे. मात्र, वेळ आल्यावर तुम्हाला कळवू, असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अद्याप निवडणुका सुरू झालेल्या नाहीत. आचारसहिंता देखील लागू झालेली नाही, त्यामुळे योग्य वेळी निर्णय सांगू असे टिकैत यांनी सांगितले.

राकेश टिकैत हे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिले होते. सध्या दिल्लीतील शेतकरी आंदोलन संपले असले तरी राकेश टिकैत हे सतत चर्चेत आहेत. दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन संपले असले तरी आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने आंदोलन मागे घेताना शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या देखील मान्य करण्याते आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. हमीभावाच्या संदर्भात केंद्र सरकारने समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समिती नेमली नाही. हरियाणामध्ये शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, अद्याप ते गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे टिकैत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना शेतकऱ्यांनी कोणतीही मदत केलेली नाही.

26 जानेवारीला प्रत्येक गावांमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढावी. ट्रॅक्टरवर तिंरगा झेंडा लावून हा मार्च काढावा. 26 जानेवारी हा आपला दिवस आहे. याबाबत आम्ही 15 जानेवारीला बैठक घेणार आहोत. या बैठकीत आम्ही 26 जानेवारीच्या मार्चबाबत तसेच, सरकारने जी आश्वासने पूर्ण केली नाहीत, त्याबाबत चर्चा करणार आहोत. तसेच पुढील रणणिती देखील त्यादिवशी ठरवणार आहोत असेही त्यांनी सांगितले. पंजाबमध्ये काही शेतकरी संघटना निवडणुका लढवत आहेत. यामुळे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचे टिकैत यांनी सांगितले.

केंद्र सरकार ऑस्ट्रेलियामधून दूध खरेदी करण्यासंदर्भात करार करण्याच्या तयारीत आहे. यातून दूध 20 ते 22 रुपयांना विकण्याचा सरकारचा मानस आहे. परदेशातून दूध खरेदी करण्याचा निर्णय घातक आहे. त्यामुळे देसातील दुग्ध उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
Kolhapur Gokul Election Result: एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
FDA Action: दसरा-दिवाळीतील मिठाईत भेसळ, 10 टन खवा जप्त! कर्नाटकवरून येणारी वाहनं थांबवली अन्...
दसरा-दिवाळीतील मिठाईत भेसळ, 10 टन खवा जप्त! कर्नाटकवरून येणारी वाहनं थांबवली अन्...
Gold Silver Rate: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा येणार चढ-उतार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या काय आहेत आजचे दर
Embed widget