एक्स्प्लोर

चिमुकल्यांच्या तस्करीप्रकरणी भाजप नेत्या जुही चौधरी गजाआड

नवी दिल्ली : चिमुकल्यांच्या तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जुही चौधरीला आज पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने जुहीला 12 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जुही चौधरी यांना सीआयडीने काल अटक केली होती. त्यानंतर भाजपकडून जुही चौधरी यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सीआयडीने काल रात्री जुहीला भारत-नेपाळ सीमेवरुन अटक केले होते. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये विमला शिशू गृह चालवणारी चंदना चक्रवर्ती नामक महिलेने जुही चौधरीचं नाव सांगितलं होतं. त्यानंतर कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी चंदना चक्रवर्तीने भाजप खासदार रुपा गांगुली आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. चंदनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात जुहीने या दोन नेत्यांशी चर्चा केली होती. कैलाश विजयवर्गीय यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत, त्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. निष्पक्ष एजन्सीकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणीही विजयवर्गीय यांनी केली आहे. तर दुसरीकडे खासदार रुपा गांगुली यांनीही आरोप फेटाळले आहेत. सीआयडीने या प्रकरणात सर्वात आधी एनजीओच्या चीफ अॅडॉप्शन ऑफिसर सोनाली मंडल, अध्यक्ष चंदना चक्रवर्ती आणि चंदनाचा भाऊ मानस भौमिक यांना अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget