एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरात पहिला हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठी भाजपच्या हालचाली, 'हा' आहे मास्टरप्लॅन

देशाचे नवे गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीत एक बैठक घेतली. या बैठकीमुळे काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.

नवी दिल्ली : देशाचे नवे गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीत एक बैठक घेतली. या बैठकीमुळे काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काश्मीरमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री बनवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत, अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. काश्मीरच्या सुरक्षेचा आढावा हा या बैठकीचा मुख्य विषय होता. परंतु त्यामध्ये काश्मीरमधल्या संभाव्य डिलिमिटेशनवरही (मतदारसंघ पुनर्रचनेवर) चर्चा झाली असल्याच्या बातम्या आल्या आणि त्यावरुन जोरदार वादळ उठलं. जम्मू काश्मीरमध्ये पहिला हिंदू मुख्यमंत्री बसवता यावा यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत? मोदी सरकारला काश्मीर विधानसभेचे डिलिमिटेशन करायचे आहे? गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये मंगळवारी काश्मीरसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि या सगळ्या चर्चांना उधाण आले. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणारी ही बैठक होती. परंतु त्यात डिलिमिटेशनची पुडी सुटली. त्यामुळे थेट काश्मीरपर्यंत त्याचे हादरे बसू लागले. काश्मीरमधले सगळे पक्ष त्यावर तावातावानं प्रतिक्रिया देऊ लागले. जम्मू-काश्मीर या राज्याचे हिंदूबहुल जम्मू, मुस्लिमबहुल काश्मीर आणि बौद्धबहुल लडाख असे तीन भाग पडतात. यातल्या जम्मू भागात 37, काश्मीरमध्ये 46 तर लडाखमध्ये 4 असे एकूण 87 विधानसभा मतदारसंघ आहेत. ज्या पक्षाला काश्मीरवर राज्य करायचे असेल. त्या पक्षाला मुस्लिमबहुल खोरे जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच जम्मूमधल्या जागा लोकसंख्येच्या आधारावर वाढल्या तर ही स्थिती बदलता येऊ शकते, असे भाजपला वाटते. या बैठकीच्या बातमीवरुन काश्मीरच्या राजकारणात खळबळ उडाली असली तरी मुळात या बैठकीत अशी कुठली चर्चा झाल्याचे सरकारने नाकारले आहे. शिवाय यासंदर्भातील कायदेशीर स्थितीही वेगळी आहे. जम्मू-काश्मीरसह संपूर्ण देशभरात 2026 पर्यंत डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघांची पुनर्रचना करता येणार नाही. नवी जनगणना झाल्यानंतरच त्यासंदर्भातली प्रक्रिया सुरु होऊ शकते. याआधी कोर्टानेही अशा अनेक केसेस धुडकावून लावत ही शक्यता नाकारली आहे. जून 2018 पासून काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे. या वर्षाच्या अखेरीस जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर निवडणुकीचं वेळापत्रक निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. डिलिमिटेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वर्षे जातात. त्यामुळे भाजपच्या मनात कितीही इच्छा असली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खूप वर्ष लागतील. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत काश्मीरचे सर्व मुख्ममंत्री हे मुस्लिम समुदायाचेच होते. त्याआधी काश्मीरमध्ये अनेक हिंदू राजांनी राज्य केले आहे. परंतु भारत-पाकिस्तान फाळणीवेळी काश्मीरप्रश्न जटिल होण्याचे प्रमुख कारणही तेच होते. काश्मीरात राजा हिंदू आणि प्रजा मुस्लिमबहुल होती. राजा हरिसिंह यांचे सुपुत्र करणसिंह हे काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत. परंतु काँग्रेसने त्यांना कधीही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपद दिले नाही. व्हिडीओ पाहा डिलिमिटेशनचा प्रयोग करुन भाजप काश्मीरमधे हिंदू मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबतची हालचाल अद्याप सुरु झालेली नाही. परंतु भाजप सरकारचे इरादे आणि दिशा मात्र स्पष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget