एक्स्प्लोर

भुवनेश्वरमध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक, पंतप्रधान मोदींचा रोड शो

भुवनेश्वर: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज ओदिशातल्या भुवनेश्वर इथं सुरु आहे. कार्यकारिणीत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भुवनेश्वरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी रोड शो केला. आपल्या गाडीच्या बाहेर येऊन त्यांनी लोकांना अभिवादन केलं. विशेष म्हणजे चालत्या गाडीवर उभं राहून मोदींनी एक प्रकारे धोकाही पत्करला. काही वेळ तर ते दोन गाड्यांच्यामध्ये उभे राहून लोकांना अभिवादन करत होते. भुवनेश्वरमध्ये आज आणि उद्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे. ज्यामध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा होण्याची शक्यता आहे. 2019साठीचं नवं लक्ष्य म्हणून ओदिशा भाजपच्या रडारवर आहे. ओदिशासह पूर्व किनारपट्टीवरच्या आसपासच्या भागांमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न म्हणून यावेळी भाजपनं त्यांच्या ‘लूक इस्ट पॉलिसीअंतर्ग’ओदिशाची निवड केल्याचं समजतं आहे. नुकत्याच ओदिशात ज्या स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपनं आश्चर्यकारकरित्या यश मिळवलं आहे. काँग्रेसला मागे टाकत ओदिशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजप पुढे येत आहे. त्यामुळे 2019ला बिजू जनता दलाला कडवं आव्हान देण्याच्या प्रयत्नात भाजप आहे. ओदिशात लोकसभेच्या 21, तर विधानसभेच्या 147 जागा आहेत. लोकसभेवेळीच ओदिशातही विधानसभा निवडणुका होतात. मात्र 2014 मध्ये देशात इतरत्र मोदी लाटेचा जलवा असताना ओदिशात मात्र अवघ्या एका जागेवर भाजपला समाधान मानावं लागलेलं होतं. यावेळी ती कसर भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सगळं भुवनेश्वर या अधिवेशनाच्या निमित्तानं भगवं झालं आहे. भाजपचे जवळपास 13 केंद्रीय मंत्री आणि जवळपास 350 पदाधिकारी या अधिवेशनाच्या निमित्तानं भुवनेश्वरमध्ये दोन दिवस तळ ठोकून आहेत. संबंधित बातम्या: 2019च्या मशागतीसाठी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्यापासून ओदिशात

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

Embed widget