एक्स्प्लोर

भाजपचे वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब

नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांनी नवा वाद निर्माण करणाऱ्या भाजपचे खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने, उत्तर प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

लखनऊ :  नेहमीच वेगवेगळ्या वक्तव्यांनी नवा वाद निर्माण करणाऱ्या भाजपचे खासदार साक्षी महाराजांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने, उत्तर प्रदेशमधील नगर पालिका निवडणुकीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नाव गायब झाल्याचं समजल्यानंतर आपल्या विरोधात षडयंत्र असल्याची टीका करत निवडणूक आयोगाच्या काराभारावर तोंडसुख घेतलं. उत्तर प्रदेशमधील उन्नाव नगर परिषदेसाठी आज मतदान झालं. स्थानिक खासदार साक्षी महाराज मतदानासाठी गेल्यानंतर, त्यांना आपलं नाव मतदार यादीतून गायब झाल्याचं समजलं. यानंतर निवडणूक आयोगाच्या कारभारवर टीका करत, हे आपल्याविरोधातील षडयंत्र असल्याचं सांगितलं. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करुन, दोषींवर कारवाई करण्याची मागणी साक्षी महाराजांनी केली आहे. दुसरीकडे मतदार यादी घोळात काँग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांचं ही नाव मतदार यादीतून गायब झालं होतं. त्यांनी याबाबत उप जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर उप जिल्हधिकाऱ्यांनी चूक मान्य करुन, चौकशीचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यातील 5 महानगरपालिका, 71 नगर परिषद आणि 154 नगर पंचायतीसाठी मतदान झालं. या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर महानगर पालिकेसाठी मतदान केलं. कोण आहेत साक्षी महाराज? साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशमधील उन्नाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार आहेत. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात. कन्नौजमधील आपल्या एका भाषणात त्यांनी मदरशांसदर्भातील एका वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला. तसेच मेरठमधील आपल्या एका भाषणात त्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदू व्यक्तीने चार मुलांना जन्म दिला पाहिजे, असं वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget