एक्स्प्लोर
भाजप आमदाराचं सोनिया गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, सोनिया गांधींची सपना चौधरीशी तुलना
हारयानाची डान्सर सपना चौधरी हिच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल बोलताना आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सपना चौधरीप्रमाणे सोनिया गांधी यासुद्ध इटलीमध्ये डान्स करायच्या. त्यावेळी राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी त्यांना स्वीकारलं, तसं राहुल गांधी यांनीसुद्धा सपनाला स्वीकारण्याचा सल्ला सुरेंद्र सिंह यांनी दिला.
नवी दिल्ली : भाजपचे उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन त्यांच्या विधानाचं निषेध व्यक्त केलं आहे. शिवाय सपना चौधरीला राहुल गांधी यांनी स्वीकारावं आणि घर संसाराला लागावं, असा सल्लाही त्यांनी दिला .
हारयानाची डान्सर सपना चौधरी हिच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल बोलताना आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सपना चौधरीप्रमाणे सोनिया गांधी यासुद्ध इटलीमध्ये डान्स करायच्या. त्यावेळी राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांनी त्यांना स्वीकारलं, तसं राहुल गांधी यांनीसुद्धा सपनाला स्वीकारण्याचा सल्ला सुरेंद्र सिंह यांनी दिला.
राहुल गांधींनी राजकारण सोडून घर संसारचं बघावं. त्यांनी सपना चौधरीला स्वीकारवं म्हणजे सासू आणि सुना दोघेही एकाच पेशातून आल्यामुळे दोघांच चांगलं जमेन. एक डान्सर इटलीहून आली आहे आणि एक भारताची, असं ते म्हणाले आहे.
शिवाय सपना चौधरी ही चरित्र्यहिन असल्याचं वादग्रस्त वक्तव्य ही त्यांनी केलं. भारताची जनता नर्तकीला देश चालवण्यासाठी कधीच स्वीकारणार नाही. देश चालवण्यासाठी नरेंद्र मोदींसारखी चारित्र्यवान व्यक्ती योग्य आहे. एका नर्तकीचं राजकारणात येण्याने भारताच्या राजकारणात कोणताही फरक पडणार नाही. राहुल गांधी यांनी आता नेत्यांवर विश्वास करायाचं सोडून नर्तकीवर विश्वास करायला सुरुवात केलं, अशी मुक्ताफळे सुरेंद्र सिंह यांनी उधळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
Advertisement