एक्स्प्लोर

भाजप नेत्याकडून तरुणीची 'दृश्यम'स्टाईल हत्या

इंदूरमध्ये 22 वर्षीय ट्विंकल डागरेची विवाहबाह्य हत्या झाली होती. या प्रकरणी 65 वर्षीय भाजप नेते जगदीश करोतिया उर्फ कल्लू पहलवान, त्याची तीन मुलं अजय, विजय आणि विनय, तसेच साथीदार निलेश कश्यप यांना बेड्या ठोकल्या आहेत.

भोपाळ : मध्य प्रदेशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या हत्येचा उलगडा करण्यात इंदूर पोलिसांना यश आलं आहे. विवाहबाह्य संबंधातून स्थानिक भाजप नेता, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या साथीदाराने एका तरुणीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे अजय देवगन-तब्बू यांची भूमिका असलेल्या 'दृश्यम' चित्रपटावरुन प्रेरणा घेत ही हत्या घडवून आणली होती. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. मध्य प्रदेशातील बाणगंगामध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय ट्विंकल डागरेची हत्या झाली होती. या प्रकरणी 65 वर्षीय भाजप नेते जगदीश करोतिया उर्फ कल्लू पहलवान, त्याची तीन मुलं अजय, विजय आणि विनय, तसेच साथीदार निलेश कश्यप यांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्विंकल आणि जगदीश करोतिया यांचे कथित विवाहबाह्य संबंध होते. ट्विंकलला करोतिया कुटुंबासोबत त्यांच्या घरात राहायचं होतं. यातूनच गृहकलहाला सुरुवात झाली आणि ट्विंकलचा जीव गेला. रोजच्या कटकटींना कंटाळून करोतियांनी ट्विंकलच्या हत्येचा कट रचला. 16 ऑक्टोबर 2016 रोजी पाच जणांनी मिळून ट्विंकलची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. जिथे ट्विंकलचा मृतदेह जाळण्यात आला होता, तिथून पोलिसांनी तिचं ब्रेसलेट आणि जोडवी जप्त केल्या. आरोपींनी दृश्यम चित्रपट पाहून त्यातून आयडिया उचलली. कुत्र्याचा मृतदेह त्यांनी एके ठिकाणी जाळला आणि खड्ड्यात कोणाचा तरी मृतदेह गाडल्याची अफवा स्वतःच पसरवली. पोलिसांनी खोदकाम करताच कुत्र्याचा अवशेष सापडला. त्यामुळे पोलिसांचा तपास काहीसा भरकटला. पोलिसांनी गुजरातमधील प्रयोगशाळेतून करोतिया आणि त्यांच्या दोन मुलांची ब्रेन इलेक्ट्रिकल ऑसलेशन सिग्नेचर (बीईओएस) चाचणी केली. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा गुन्हा सोडवण्यासाठी या टेस्टचा वापर करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget