एक्स्प्लोर
राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्र्यांची जीभ घसरली
राहुल गांधींना मेंटल सिजोफ्रेनियाचा आजार असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे, असं म्हणत चौबेंनी राहुल गांधींची तुलना किड्याशी केली.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. अश्विनी चौबे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं. राहुल गांधींना मेंटल सिजोफ्रेनियाचा आजार असून त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे, असं म्हणत चौबेंनी राहुल गांधींची तुलना किड्याशी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला उत्तर देताना अश्विनी चौबे म्हणाले, की “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकार आभाळासारखा आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्ष नालीतल्या किड्यासारखे आहेत” ''देशाच्या पंतप्रधानांना अपशब्द वापरणारे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्षच स्वतः नालीतल्या किड्यासारखे आहेत आणि तेच स्वतःच काँग्रेसमुक्त भारत करतील,'' असं अश्विनी चौबे म्हणाले. शिवाय सरकारविरोधात उघडण्यात आलेल्या महाआघाडीतील नेत्यांना जनतेचा शाप लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अश्विनी चौबे यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावरही निशाणा साधला. “जनावरांचा चारा खाणारे आज तुरुंगात आहेत. ज्या गरीबांना आरजेडी नेत्यांनी धोका दिलाय, त्यांच्या शापामुळे ते आयुष्यभर तुरुंगात राहतील,” असं चौबे म्हणाले. पाहा व्हिडीओ :
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj






















