BJP Leader And Former Karnataka CM B.S. Yediyurappa: नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते (Senior Leader of BJP) आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री (Former Karnataka CM) बी. एस. येडियुरप्पा (B.S. Yediyurappa) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो अॅक्ट (POCSO Act) अंतर्गत येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 वर्षांच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (81) यांच्यावर गुन्हा दाखल केला. 17 वर्षांच्या मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (POCSO) च्या कलमाखाली कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलीस सूत्रांनी द हिंदूला दिलेल्या माहितीनुसार, POCSO कायद्याच्या कलम 8 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या पीडितेच्या सोबत असलेल्या आईनं गुरुवारी संध्याकाळी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि मध्यरात्री माजी मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचाराची कथित घटना 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडली, जेव्हा आई आणि मुलगी एका फसवणूक प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांकडे मदत मागण्यासाठी गेल्या होत्या.