एक्स्प्लोर

2019 साठी भाजपची वॉर रुम, नव्या मुख्यालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन

भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाचा पत्ता आता 11 अशोका रोड ऐवजी 6, दीनदयाल उपाध्याय मार्ग असा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाचा पत्ता आता 11 अशोका रोड ऐवजी 6, दीनदयाल उपाध्याय मार्ग असा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व राजकीय पक्षांना त्यांची कार्यालयं ल्युटन्स दिल्लीच्या बाहेर स्थलांतरित करायची आहेत. दीनदयाल उपाध्याय मार्गावर 2 एकराच्या परिसरात भाजपने हे नवीन मुख्यालय उभारलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या असणार आहेत. एकाचवेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय असेल. या बांधकामात hollow bricks चा वापर करुन इमारतीचं वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे, तर वीजेसाठी सोलर पॅनेलचा वापर करण्यात आला आहे. वॉटर हार्वेस्टिंग, बायोटॉयलेटसचा समावेश करुन पर्यावरणाची काळजी घेतल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपच्या या नव्या मुख्यालयात एकाचवेळी 600 लोक बसू शकतील अशा दोन कॉन्फरन्स रुमही असतील. वायफाय, एलिव्हेटर, टीव्ही मुलाखतींसाठी स्टुडिओ, डिजिटल लायब्ररी अशा सर्व सोयींनी युक्त असं हे मुख्यालय असेल. त्यामुळे 2019 साठी भाजपची वॉर रुम आता 11, अशोका रोडवरुन 6, दीनदयाल उपाध्याय मार्गावर असणार हे आता निश्चित झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा प्रसार, एका महिन्यात 12 मुलांचा मृत्यू, 3 जणांना संसर्ग; अद्याप लस सुद्धा नाही!
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
बारमध्ये पार्टी सुरु असतानाच आग लागल्याने 27 जणांचा कोळसा, 60 जण होरपळले; जीव वाचवण्यासाठी टाॅयलेटमध्ये लपले
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
युद्ध पुन्हा पेटलं असतानाच इराणमध्ये अशा सिक्रेट रशियन विमानाची एन्ट्री, अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्पची सुद्धा पाचावर धारण बसली पाहिजे! या विमानाची माहिती कधीच उघड केली जात नाही कारण..
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
धक्कादायक! मुलाच्या ऑपरेशनसाठी पेरोलवर बाहेर; पण स्वतःला वाचवण्यासाठी सराईत गुन्हेगाराचा चक्क तुरुंगातच आश्रय
Mumbai Crime News: 'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
'त्या' विषारी कॅप्सूलचे कनेक्शन थेट दिल्ली ते ओमानपर्यंत; इराण, इराक देशातील नंबरही मिळाले, आरोपीच्या मोबाइलमध्ये आक्षेपार्ह मेल अन् तपासात...
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
प्रभू श्रीरामांचा बॅनर, भगवा झेंडा, गावागावात जाऊन सभा घेणार; राम मंदिर चोरीवरुन भास्कर जाधव आक्रमक
Gold Silver Rate : अमेरिका इराण युद्धामुळं सोने- चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु, आठवड्यात सोने 4000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोने-चांदीचे लेटेस्ट दर
Embed widget