एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या जॅकेटवरुन राजकारण, भाजपचे गंभीर आरोप

'मोदी सरकार हे सुटाबुटांच सरकार आहे.' अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपने त्यांच्या जॅकेटवरुन निशाणा साधला आहे.

शिलाँग (मेघालय) : 'मोदी सरकार हे सुटाबुटांच सरकार आहे.' अशी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर आता भाजपने त्यांच्या जॅकेटवरुन निशाणा साधला आहे. राहुल गांधी सध्या मेघालयच्या दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवार) शिलाँगमध्ये मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासोबत राहुल गांधी एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी थंडीपासून बचाव व्हावा यासाठी त्यांनी काळ्या रंगाचं एक जॅकेट परिधान केलं होतं. पण आता याच जॅकेटवरुन राजकारण सुरु झालं असून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपने असा दावा केला आहे की, राहुल गांधींनी जे जॅकेट परिधान केलं होतं. ते लंडनच्या 161 वर्ष जुनी कंपनी 'बरबरी'चं आहे. बरबरी हा जॅकेट, कपडे आणि चष्माचा प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे. भाजपनं असा आरोप केला आहे की, 'राहुल गांधींचं हे जॅकेट काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारातूनच हे जॅकेट आलं आहे.' असाही आरोप भाजपने केला आहे. ब्लूमिंगडेल्स वेबसाइटच्या मते, या जॅकेटची किंमत 68145 रुपये आहे. भाजपने राहुल गांधींवर टीका केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील भाजपला तात्काळ उत्तर देत पंतप्रधान मोदींचा सूट आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्या चष्माच्या फोटो ट्वीट करुन पलटवार केला आहे. 'हे लोकं या गोष्टीने चिंताग्रस्त आहेत की, राहुल गांधी हे मेघालयमधील लोकांमध्ये मिसळत आहेत. कारण की, आता मेघालयमधील जनता ढोंगीपणा आणि खोट्या आश्वासनांसाठी तयार नाही.' असं ट्वीट करत प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, 27 फेब्रुवारीला मेघालयमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे आता येथील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून एकमेकांवर वार-पलटवार सुरु झाले आहेत. गेली 15 वर्ष मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने आता भाजपने मेघालय जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget