एक्स्प्लोर

देशात राजकीय रण, राहुल गांधी परदेशात, भाजपची टीका

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ताज्या परदेश दौऱ्याची ट्विटरवर घोषणा केली आणि राजधानीत त्यावरुन जोरदार गदारोळही सुरु झाला. आजीला आणि इतर कुटुंबियांना भेटण्यासाठी परदेशी जात असून पुढचे काही दिवस इटलीत असेन, असं राहुल गांधींनी ट्विटरवर जाहीर केलं. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास राहुल गांधींनी हे ट्विट केलं आणि पुढच्या तासाभरात भाजप मुख्यालयातून टीकेच्या तोफा धडाडू लागल्या. सध्याच्या राजकीय वातावरणात राहुल गांधींच्या टायमिंगची दबक्या आवाजात चर्चा होत असताना भाजप प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी 'राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यानं आपल्याला कुठलाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. राहुल गांधी हे त्यांच्या विदेश दौऱ्यांच्या मध्ये वेळ मिळाला की भारताला भेट देत असतात' असा खोचक टोला लगावला. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र राहुल गांधी हे त्यांच्या 93 वर्षांच्या आजीला भेटायला जात असून, या गोष्टीचं नाहक राजकारण करु बघणाऱ्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो असं म्हटलेलं आहे. https://twitter.com/OfficeOfRG/status/874554135982428160 राजकारणात नेत्यांनी लोकांसाठी सतत उपलब्ध असणं गरजेचं असतं, आणि राहुल गांधींची राजकीय कमिटमेंट आजवर कधी दिसलीच नाही असा आरोप भाजपचे नेते सतत करत असतात. सध्या मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन वातावरण पेटलं आहे. राहुल गांधींनी मंदसौरमध्ये जाऊन या शेतकऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानंच त्यांच्यावर ही वेळ आल्याचा आरोप केला होता. ज्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची मोट बांधण्यात व्यस्त आहेत, तेव्हाच राहुल गांधी परदेशी जात आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे ज्या सोनिया गांधी, गेल्या काही महिन्यांत सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हत्या. त्यांच्याकडेच पुन्हा एकदा विरोधकांची एकजूट करण्याची जबाबदारी आलेली आहे. यूपीएकडे विजयी होण्याइतकं संख्याबळ नसलं तरी 2019 साठी विरोधकांच्या एकीची रंगीत तालीम म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. बुधवारी यासंदर्भात जवळपास 17 विरोधी पक्षांची बैठक राजधानी दिल्लीत होत आहे. राहुल गांधी मात्र या बैठकीला उपस्थित नसतील. येत्या 19 जूनला राहुल गांधी वयाची 47 वर्षे पूर्ण करतील. या वाढदिवसालाही ते परदेशातच असतील.

महत्त्वाच्या बातम्या

रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं, ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
सर्वसामान्य लोकांना पुन्हा महागाईचा धक्का बसणार! मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार? नेमकी किती होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वसामान्य लोकांना पुन्हा महागाईचा धक्का बसणार! मोबाईल रिचार्ज पुन्हा महाग होणार? नेमकी किती होणार वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
Embed widget