एक्स्प्लोर

मनोहर पर्रिकरांच्या राजकीय वारसदारांच्या कारवर अज्ञातांकडून बियरच्या बॉटल फेकून हल्ला

सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यामुळे पणजी शहरात तणाव वाढला आहे. त्यातच आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून 19 मे रोजी मतदान होणार आहे.

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. पणजी मधील मळा भागात हेल्मेट परिधान करुन दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी बियरच्या बॉटल फेकून हल्ला केला. ही घटना काल मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची काल रात्री प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत नितिन गडकरींनी सिद्धार्थ कुंकळ्येकरांना मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार तसेच जमिनीवरचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून उल्लेख केला होता. सभा संपवून सिद्धार्थ कुंकळ्येकर मळा मार्गे आपल्या घरी जात असताना अंधारातून दुचाकीवरुन आलेल्या युवकांनी त्यांच्या कारवर बियरच्या बॉटल फेकून हल्ला केला. या घटनेत कारचे नुकसान झाले आहे.  यासंदर्भात सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पणजी पोलिसात तक्रार नोंदवली असून दोषीना लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पणजी शहरात तणाव वाढला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून 19 मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि काँग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मतदार संघ असल्याने सगळ्या देशाचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. सिद्धार्थला निवडून गोवा सरकारच्या स्थिरतेला बळकटी द्या : गडकरी गोव्यात सरकार चालवणं खूप कठीण ठरणार आहे.  हे सरकार गेले तर गोव्याचे आणखी हाल होणार आहेत. म्हणून सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना निवडून आणून या सरकारच्या स्थिरतेला बळकटी द्या आणि मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंबंधी आयोजित भाजपच्या जाहीर सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी केंद्रीय आयूष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर, नगर विकास मंत्री मिलिंद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित होते. गोवा राज्य हे जल आणि वायू प्रदूषणमुक्त झाले तर ती खऱ्या अर्थाने मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली ठरेल. हे तंत्रज्ञान देशात उपलब्ध असून राज्य सरकारने मनोहर पर्रीकर यांच्या नावे ही योजना राबवावी, असा सल्ला गडकरी यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना दिला. मनोहर पर्रीकर यांचे हृदय, मन आणि आत्मा हा गोव्याशी जुळला होता आणि त्यामुळेच सरंक्षणमंत्रिपदाचा त्याग करून ते गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यासाठी गोव्यात आले, असेही गडकरी म्हणाले. काँग्रेस ही गुणग्राहक पार्टी ठरली आहे. त्यांनी पणजीकरांना ‘सर्वगुणसंपन्न’ उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र मनोहर पर्रीकर यांचे राजकीय वारसदार तसेच जमिनीवरचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिला आहे. सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचे मत म्हणजे मनोहर पर्रीकर यांनी पणजी शहरासाठी पाहिलेल्या स्वप्नपूर्ततेसाठीचे मत असेल हे लक्षात ठेवूनच पणजीकरांनी मतदान करावे,असे आवाहन गडकरी यांनी केले. मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुभाष वेलिंगकर यांनी निवडणूक लढवणे यांसारखी दुसरी दुर्दैवी आणि दुख:द गोष्ट नाही, अशी खंत नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. वेलिंगकर यांचा आपण आदर करतो. ते स्वत: निवडून येऊ शकत नाहीत हे त्यांच्या पक्षाची मागील कामगिरी पाहून लक्षात येते. पण, भाजपच्या मतांचे विभाजन करून काँग्रेसच्या सर्वगुणसंपन्न उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वेलिंगकर यांनी वावरावे यासारखी खेदजनक बाब नाही, असेही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget