एक्स्प्लोर

काँग्रेसचं वर्चस्व मोडित, राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष

राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मोदी सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं अडकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते.

नवी दिल्ली : काँग्रेसला मागे टाकत भाजप राज्यसभेत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे राज्यसभेत 58 खासदार झाले असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या 57 वर गेली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार संपतिया उइके यांचा शपथविधी झाला. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएकडे या सभागृहात निर्णायक बहुमत नाही. मात्र जेडीयू सोबत आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे 2018 पर्यंत राज्यसभेत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली. दुसरीकडे, तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षही एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यसभेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल. सध्या अनेक महत्वाच्या विधेयकांच्या वेळी अण्णा द्रमुकने भाजपला साथ दिलेली आहे. मात्र ते अधिकृतरित्या एनडीएचे सदस्य नाहीत. अण्णा द्रमुकचे राज्यसभेत 12 खासदार आहेत. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मोदी सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं अडकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील 9 पैकी 8 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget