- आरजेडी (लालू) – 80
- जेडीयू (नितीश कुमार) – 71
- काँग्रेस – 27
- भाजप – 53
- सीपीआय – 3
- लोक जनशक्ती पार्टी – 2
- राष्ट्रीय लोक समता पार्टी – 2
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 1
- अपक्ष – 4
बिहारमध्ये मोदी-नितीश पर्व, नितीश कुमार सरकार स्थापनेचा दावा करणार
एबीपी माझा वेब टीम | 26 Jul 2017 09:24 PM (IST)
भाजपने नितीश कुमार यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे.
पाटणा : भाजपने नितीश कुमार यांना बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. नितीश कुमार थोड्याच वेळात सरकार स्थापनेसाठी दावा करणार असल्याची माहिती भाजपचे बिहारमधील वरिष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी दिली आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला आहे. नितीश कुमार यांचा राजीनामा “बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासूनची जी परिस्थिती सुरु आहे, त्यामध्ये काम करणं अशक्य झालं आहे. लालू यादव आणि काँग्रेसशी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली, मात्र काहीही तोडगा निघाला नाही”, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर दिली. जेडीयूच्या आमदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल (एकूण 243 सदस्य) :