एक्स्प्लोर

अधिवेशन काळात भाजपच्या खासदाराचं निधन

22 जुलै रोजी जयपूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालली बैठकीत सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते. प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने अॅम्बुलन्स बोलावण्यात आली.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सांवरलाल जाट यांचं आज (बुधवार) सकाळी निधन झालं. सांवरलाल जाट काही दिवसांपासून आजार होते आणि त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सांवरलाल जाट मोदी सरकारमध्ये जलसंवर्धन राज्यमंत्री होते. के 62 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1955 रोजी झाला होता. 22 जुलै रोजी जयपूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालली बैठकीत सांवरलाल जाट बेशुद्ध पडले होते. प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने अॅम्बुलन्स बोलावण्यात आली. त्यानंतर सांवरलाल जाट यांना जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र 27 जुलै रोजी त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये हलवण्यात आलं होतं. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांवरलाल जाट यांना एम्समध्ये आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती. सांवरलाल जाट यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सचिन पायलट यांचा पराभव केला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सांवरलाल जाट यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटरवर आपल्या भावनांना वाट केली https://twitter.com/narendramodi/status/895130135137046528 कोण होते सांवरलाल जाट? सांवरलाल जाट हे अजमेरमधून लोकसभा खासदार होते. मोदी सरकार ते जलसंवर्धन राज्यमंत्रीही होते. 9 नोव्हेंबर 2014 पासून 5 जुलै 2016 पर्यंत त्यांनी जलसंवर्धन राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम केलं. सांवरलाल यांचा जन्म 1 जाने 1955 रोजी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील गोपालपुरा गावात झाला होता. वाणिज्य शाखेत पदव्युत्त शिक्षण घेतल्यानंतर राजस्थान विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केलं. अजमेर जिल्ह्यातील भिनाई विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1993, 2003 आणि 2013 मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये मंत्रीही होते. 2014 मध्ये अजमेरमधून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना केंद्रात राज्यमंत्री बनवण्यात आलं. परंतु मंत्रिमंडळ फेरबदलादरम्यान मंत्रिपदावरुन हटवण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर टायगर श्राॅफ टार्गेटवर; मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget