एक्स्प्लोर

यापुढे बिटकॉईनची ऑनलाईन खरेदी बंद, आरबीआयचे आदेश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत आदेश जारी केले आहेत. तर आरबीआयने स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : यापुढे कुणालाही ई-वॉलेट, नेट बँकिंग किंवा डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिटकॉईनसारख्या क्रिप्टो करन्सीची खरेदी करता येणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत आदेश जारी केले आहेत. तर आरबीआयने स्वतःचीच डिजीटल करन्सी जारी करण्यासाठी एका सल्लागार समितीची नियुक्ती केली आहे. बिटकॉईन खरेदीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार आणि फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने हे निर्देश दिले. सर्व ई-वॉलेट कंपन्या आणि बँकांना या व्यवहारासाठी मनाई करण्यात आली आहे. यामुळे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मदत होईल, असं आरबीआयचं म्हणणं आहे. आरबीआयची स्वतःचीच डिजीटल करन्सी आरबीआयने एका समितीची नियुक्ती केली. ही समिती आरबीआयने स्वतःच डिजीटल करन्सी जारी करण्याबाबत सल्ला देणार आहे. आरबीआय जे डिजीटल नाणं जारी करणार आहे, त्यामुळे कागदी चलन छापण्याचा खर्च वाचणार आहे. मात्र ही व्हर्च्युअल करन्सी कधी येईल, याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही. सरकारने यापूर्वीही बिटकॉईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. बिटकॉईन हे आरबीआयचं अधिकृत चलन नाही, त्यामुळे यापासून दूर रहावं, असं आरबीआयनेही म्हटलं होतं. काय आहे बिटकॉईन? बिटकॉईन हे एक नवं डिजीटल चलन आहे. कॉम्प्युटर नेटवर्किंगवर आधारित व्यवहारांसाठी याची निर्मिती झाली. 2009 मध्ये याचा शोध सातोशी नाकामोतो नावाच्या एका जपानी इंजिनियरने लावला. बिटकॉईनसाठी खरेदी केल्यानंतर कॉप्युटर किंवा मोबाईलवर त्याचे इ वॉलेट तयार होतं. या प्रणालीमध्ये एक व्यक्ती एकपेक्षा जास्त वॉलेट तयार करु शकतात. याचा वापर ईमेलप्रमाणे केला जातो. पण यात फरक केवळ इतकाच आहे की, याचा पत्ता केवळ एकदाच वापरता येतो. याचा वापर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच करता येतो. तसेच याचं नियंत्रण कोणत्याही एका अधिकृत संस्थेकडे किंवा सरकारकडे नाही. सध्या बिटकॉइनचं मूल्य भारतीय चलनानुसार तब्बल 70 हजारापेक्षा जास्त आहे. संबंधित बातम्या :

एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल

बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

नांदेडमध्ये बिटकॉईन कंपनीचा अनेकांना कोट्यवधींचा गंडा, गुन्हा दाखल

बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक

बिटकॉईनपासून दूर राहा, आरबीआयचा सल्ला

बिटकॉईनमधली गुंतवणूक पोंझी स्कीमसारखी : अर्थ मंत्रालय

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर संकट, आयकर विभागाकडून नोटिसा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
Embed widget