Covid Vaccine Milestone : जगासह भारताही कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारकडून देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवली. या पार्श्वभूमीवर भारताने मोठा विक्रम रचला आहे. देशव्यापी लसीकरणात भारताने 200 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात 548 दिवसांमध्ये कोरोना लसीचे 200 कोटीहून डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. केवळ 18 महिन्यांमध्ये भारताने 200 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. मांडविया यांनी सांगितंल की, भारताने फक्त 18 महिन्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 200 कोटीहून अधिक डोस दिले आहेत.
देशात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात
कोरोना महामारी सुरु झाल्यापासून भारत कोरोनाविरोधात दोन हात करत आहे. कोरोना विषाणू आढळल्यानंतर एका वर्षाच्या आतच भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करत मोठ पायंडा रचला. देशात 16 जानेवारी 2021 पासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. आता भारताने 200 कोटी लसीचे डोस देत लसीकरणात मोठा विक्रम केला आहे.
पंतप्रधान मोदींनी जनतेला दिल्या शुभेच्छा
देशव्यापी लसीकरणाचा 200 कोटी लसींचा टप्पा ओलांडल्याने पंतप्रधान मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या