Graduate Chaiwaali Bihar : अनेक वेळा नोकरी मिळवण्यासाठी लोक प्रयत्न करतात. नोकरी मिळाली नाही तर स्वत:ला किंवा नशिबाला दोष देतात. पण नोकरी मिळाली नाही म्हणून निराश न होता एका मुलीनं चहाची टपरी सुरू केली आहे. बिहारमधील (Bihar) पाटणा (Patna) येथे राहणाऱ्या 24 वर्षाच्या प्रियांका गुप्तानं (Priyanka Gupta) नोकरी मिळाली नाही म्हणून चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रियांका ही अर्थशास्त्र पदवीधर आहे.
बिहारमधील पूर्णिया या जिल्ह्यामध्ये राहणारी प्रियांका ही बँकेतच्या स्पर्धा परीक्षेत नापास झाल्यानंतर पाटणा महिला महाविद्यालयाजवळ चहाची टपरी चालवत आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियांकाने यावर्षी 11 एप्रिलपासून चहाची टपरी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीमध्ये प्रियांकानं सांगितलं, मी 2019 मध्ये अंडरग्रॅज्युएशन पूर्ण केलं. गेली दोन वर्ष मी बँकेच्या स्पर्धा परिक्षेत पास होण्याचा प्रयत्न करत होते. पण मला त्यामध्ये यश मिळालं नाही. म्हणून मी चहा विकण्याचा निर्णय घेतला.'. 'देशात अनेक चहावाले आहेत. मग एक चहावाली का होऊ शकत नाही?', असं देखील प्रियांका म्हणाली.
MBA चहा वाल्याकडून घेतली प्रेरणा
अहमदाबादमध्ये चहाचे दुकान चालवणाऱ्या प्रफुल्ल बिलोरला प्रियांका आपला आदर्श मानते. बिलोर यांनी एमबीए करूनही चहाचे दुकान सुरू केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :