मुंबई : बिहारमध्ये (Bihar) झालेल्या सत्तानाट्यानंतर अखेर भाजपने (BJP) सत्ता मिळवली. भाजपच्या साथीने नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. रविवार 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि आरजेडी सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. दरम्यान भाजपच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आहे. नितीश कुमार यांच्यसह भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 






महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सत्तापालटली असून राज्य सरकारची समिकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता  नितीश कुमार हे 9 व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान यामध्ये भाजपचे काही नेते देखील मंत्रीमंडळात सामील होतील. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील उपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच काम राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत. 


बिहारमधील पक्षीय बलाबल


बिहार विधानसभा 243 सदस्यांची आहे. म्हणजे विधानसभेचे 243 आमदार आहेत. विधानसभेच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत लालूंचा आरजेडी हा सर्वात मोठा पक्ष ठरला. आरजेडीला 79 जागा मिळाल्या. दुसऱ्या स्थानावर  78 आमदारांसह भाजप आहे. तिसऱ्या स्थानावर सध्याच्या महायुतीतील जेडीयू अर्थात नितीश कुमारांच्या पक्षाचे 45 आमदार आहेत. या युतीत काँग्रेसही आहे, ज्यांच्याकडे 19 आमदार आहेत. 



 बिहारमधील संख्याबळ  


आरजेडी - 79


भाजप - 78
जेडीयू - 45
काँग्रेस - 19
CPI(ML)L - 12
हम - 4
CPI -2 
CPIM - 2
अपक्ष,इतर - 1
MIM - 1
-------------
एकूण - 243 


हेही वाचा : 


Nitish Kumar : नितीशकुमारांच्या कलट्यांवर 'गयाराम' सुद्धा ओशाळले; भाजपच्या मांडीला मांडी लावून अखेर पुन्हा बसले!