Muzaffarpur : डॉक्टरांनी पोटातून काढला काचेचा ग्लास; रुग्णाचं म्हणणं ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
Bihar News : रुग्णाच्या पोटात काचेचा ग्लास. डॉक्टरांकडून यशस्वी शस्त्रक्रिया. रुग्ण म्हणतो...
Bihar News : बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूर (Muzaffarpur District) जिल्ह्यात डॉक्टरांच्या पथकानं ऑपरेशन दरम्यान 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून काचेचा ग्लास काढला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बद्धकोष्ठ आणि तीव्र पोटदुखीची तक्रार करत मुझफ्फरपूर शहरातील माधापूर (Madhapur Area) भागातील एका खाजगी रुग्णालयात पोहोचला होता आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातील काचेचा ग्लास काढला होता.
रहस्यमयी घटनेची सर्वच स्तरांतून चर्चा
वैशाली जिल्ह्यातील (Vaishali District) महुआ भागातील रहिवाशी असलेल्या रूग्णावर शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. महमुदुल हसन म्हणाले की, या रूग्णाच्या सोनोग्राफी आणि एक्स-रे अहवालात त्याच्या आतड्यांमध्ये काही गंभीर गडबड झाल्याचं दिसून आलं आहे.
ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाचे काढलेले एक्स-रे आणि ऑपरेशनचं व्हिडीओ फुटेज शेअर करत डॉक्टर म्हणाले की, "काचेचा ग्लास रुग्णाच्या पोटात कसा गेला, हे अद्याप रहस्यचं आहे. जेव्हा आम्ही याबाबत रुग्णाला विचारणा केली, तेव्हा त्यानं सांगितलं की, चहा पिताना त्यानं चुकून ग्लास गिळून टाकलं. दरम्यान, वैज्ञानिक तथ्यांनुसार, काचेचा ग्लास गिळण्यासाठी मानवाची अन्ननलिका फारच लहान आहे.
आतड्यांतून काढला काचेचा ग्लास
हसन यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे गुदाशयातून काचेचा ग्लास बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे आम्हाला अखेर रुग्णाची आतडी कापून शस्त्रक्रिया करुन काचेचा ग्लास बाहेर काढावा लागला. या रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. असं असलं तरी रुग्णाला पूर्णपणे ठणठणीत होण्यास आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे.
रुग्णाची प्रकृती स्थिर
हसन यांनी सांगितलं की, रुग्णाचे पोट काही महिन्यांत बरं होण्याची अपेक्षा आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण शुद्धीवर आला आहे. अशातच रुग्णाला पूर्ण बरं होण्यास आणखी काही काळा लागू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Trending News : फोटोमध्ये दडलाय 7 अंकी नंबर, आम्हाला सापडलाय, पाहा तुम्हाला जमतंय का?
- Exam: अशी कोणती वस्तू आहे जी कोरडी असताना 1 किलो, ओली झाली तर 2 किलो आणि जळाली तर 3 किलो होते?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha