Bihar Results 2020 | बिहारमध्ये एनडीएला बहुमत तर राजद सर्वात मोठा पक्ष
Bihar Results 2020 : बिहारमध्ये एनडीएला 125 जागांवर विजय मिळाला आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या महागठबंधनला 110 जागा मिळाल्या आहेत. 75 जागा जिंकत राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूच्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार असल्याचं आश्वासन भाजपने दिलं आहे.
पाटणा : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एका नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाच एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या खात्यात 125 जागा जमा झाल्या आहेत. तर सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर असलेल्या महागठबंधनला 11o जागा मिळाल्या.
दरम्यान काल (10 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता सुरु झालेली बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया आज पहाटेपर्यंत सुरु होती. परंतु निकाल येण्यास विलंब होणार असल्याचं निवडणूक आयोगाने काल दुपारीच सांगितलं होतं. मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाने दुपारी आणि रात्री एक वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानंतर आज पहाटे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात आला.
बिहारमध्ये चुरशीच्या निकालानंतर NDA चीच सत्ता, पंतप्रधान म्हणाले, 'हा लोकशाहीचा विजय'
एनडीएमध्ये जागांबाबत बोलायचं झाल्यास भाजपला जेडीयूच्या पुढे आहे. भाजपला 74 जागा मिळाल्या असून जेडीयूला 43, व्हीआयपीला 4 आणि हमला चार जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनमध्ये राजदला 76, काँग्रेसला 19 आणि डाव्या पक्षांना 16 जागा मिळाल्या आहेत.
मतांच्या टक्केवारीत सर्वाधिक 23.1 टक्के वोट शेअर राजदला मिळाले आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला 9.48 टक्के आणि डाव्यांना 1.48 टक्के मतं मिळाली आहेत. तर एनडीएमध्ये भाजपने 19.46 टक्के, जेडीयूने 15.38 टक्के मतं मिळवली आहेत.
बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल
एनडीए -125 भाजप - 74 जेडीयू - 43 विकासशील इन्सान पार्टी - 04 हिंदुस्तानी अवाम मोर्चा - 04
महागठबंधन - 110 राजद - 75 काँग्रेस - 19 भाकपा-माले - 12 सीपीएम - 02 सीपीआय - 02
याशिवाय एआयएमआएमने 5, बहुजन समाज पक्षाने एक, लोक जनशक्ती पक्षाने एक जागेवर विजय मिळवला आहे. तर अपक्षाच्या खात्यात एक जागा गेली आहे.
बिहारमध्ये राजडी सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर बिहारमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालं असलं तर इथे राजद 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 74 जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकवर आहे. भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 21 जागांचा फायदा झाला आहे. 2015 च्या निवडणुकीत भाजपला 53 जागा मिळाल्या होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे. जेडीयूला यंदा 43 जागाच मिळवला आल्या. मागील निवडणुकीत जेडीयूला 71 जागा मिळाल्या होत्या.