एक्स्प्लोर

कर्नाटकात भाजपला दणका, 220 मठांचं काँग्रेसला समर्थन

देशाच्या विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळवणाऱ्या भाजपच्या विजयी रथाला कर्नाटकात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिल्याने, अमित शाहांना कर्नाटकातील मठाधिपतींनी दणका दिला आहे. तब्बल 220 मठांनी काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली आहे.

बंगळुरु : देशाच्या विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळवणाऱ्या भाजपच्या विजयी रथाला कर्नाटकात ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कारण, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्यास नकार दिल्याने, अमित शाहांना कर्नाटकातील मठाधिपतींनी दणका दिला आहे. तब्बल 220 मठांनी काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटकात सध्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म देण्याची मागणीने जोर धरला आहे. या मागणीसाठी आग्रही असलेल्या मठाधिपतींनी अमित शहांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शनिवारी 220 मठांच्या मठाधिपतींनी बैठक घेऊन काँग्रेसला समर्थन देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, लिंगायत समाजाने मठाधिपतींच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचे ठरवल्यास, कर्नाटकात भाजपच्या विजयीरथाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. बंगळुरुच्या बसव भवनमध्ये झालेल्या बैठकीत चित्रादुर्गाचे प्रसिद्ध मुरुगा मठाचे मठाधिपती राजेंद्र स्वामी, बसव पीठाच्या प्रमुख माता महादेवी, सुत्तुर मठाचे मठाधिपतींसह एकूण 220 मठाचे मठाधिपती सहभागी झाले होते. या बैठकीत सर्व मठाधिपतींनी काँग्रेसला समर्थन देण्याचा एकमताने निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या निर्णयापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की, “मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं नाही. त्यांची मदत केली. त्यामुळे या निवडणुकीत सर्व मठांचं सिद्धरामय्या यांनाच समर्थन मिळेल.” तर दुसरीकडे अमित शाह यांनी वीरशैव धर्मगुरुंच्या भेटी घेतल्या होत्या. या भेटींदरम्यान केंद्र सरकार कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा प्रस्ताव फेटाळून लावेल, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, कर्नाटकातील लिंगायत समाजातील वीरशैव समाज हा काँग्रेसच्या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 
संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Embed widget