अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पंरप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जवळपास तीन तास अयोध्येत थांबणार आहेत. यादरम्यान त्यांनी राम मंदिराच्या परिसरात पारिजातकाचं रोपटं लावणालं. त्यानंतर भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी रवाना झाले. वेद-पुराणांमध्ये पारिजातकांच्या झाडाचं अत्यंत महत्त्व सांगण्यात आलं आहे.


पारिजातकाबाबत एक कहाणी अशी सांगण्यात येते की, हे झाड साक्षात श्रीकृष्ण स्वर्गातून धरतीवर घेऊन आले होते. सत्यभामेचा हट्ट पुरवण्यासाठी हे झाड श्रीकृष्णाने धरतीवर आणलं अशी अख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर ते गुजरातमधील द्वारकेत स्थापित करण्यात आलं. त्यानंतर अर्जुनाने द्वारकेतून संपूर्ण पारिजातकाचं झाड घेऊन आला आणि ते उत्तर प्रदेशातील किंतूर गावात लावलं. हे झाड पाहण्यासाठी देशभरातून अनेक भाविक येत असतात. तसेच या वृक्षाच्या संवर्धनासाठी विविध स्तारांमधून प्रयत्न केले जात आहेत.


पारिजातकाचं झाड 10 ते 30 फुटांपर्यंत उंच असतं. खासकरुन हे झाड हिमालयात आढळून येतात. याची फुलं, पानांचा उपयोग औषधं तयार करण्यासाठी केला जातो.


पाहा व्हिडीओ : राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललासाठी रत्नजडीत पोशाख



देवराज इंद्र यांनी स्वर्गात पारिजातकाचं झाड लावलं होतं


असं सांगण्यात येतं की, पारिजातकाचं झाड देवराज इंद्र यांनी स्वर्गात लावलं होतं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेचा हट्ट पुरवण्यासाठी हे झाड धरतीवर आणलं. याची फुलं पांढऱ्या रंगाची आणि लहान असतात. महत्त्वाचं म्हणजे, या फुलांचा देठ भगव्या रंगाचा असतो. ही फुलं रात्री फुलतात आणि सकाळी झाडावरून स्वतःच उन्मळून पडतात. या फुलांचा सुगंध सर्वांचं मन मोहून टाकतो. या झाडाला पारिजातक किंवा प्राजक्त असंही म्हटलं जातं.


राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललासाठी रत्नजडीत पोशाख


प्रभू श्रीराम यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सर्वांच्या स्वप्नातलं राम मंदिर अखेर साकारण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन पार पाडणार आहे. भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली असून जवळपास सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशातच राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललाला हिरव्या आणि भगव्या रंगाची वस्त्र परिधान करण्यात आली आहेत. दरम्यान, रामललाची वस्त्र मलमलच्या कपड्यांनी तयार करण्यात आली आहेत. या वस्त्रांवर 9 प्रकारची रत्न लावण्यात आली आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :