इंदूर: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भय्यू महाराजांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


भय्यू महाराज यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून संबोधलं जातं. आध्यात्मिक क्षेत्रासोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस होते. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी म्हणजेच दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी ट्विटरवरुन मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.


भय्यूजी महाराज हे आपल्या कुटुंबीयांसारखेच होते, अशा भावना महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.


विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भय्यूजी महाराजांच्या निधनाचं वृत्त चटका लावणारं असल्याचं म्हटलं आहे.


अनेकांना जीवन जगण्याचा मंत्र देणाऱ्या राष्ट्रसंत भय्यूजी महाराजांनी आपली जीवनयात्रा संपवली, ही खूप मोठी शोकांतिका असल्याचं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात आला आहे.


भय्यू महाराजांच्या निधनामुळे कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लिहिलं आहे


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही भय्यूजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता, मात्र भय्यूजींनी तो नाकारला होता.


कोण होते भय्यू महाराज?

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता.

भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.

इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.



संबंधित बातम्या


भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं


हे मृत्युंजय महादेवा, मी तुला शरण आलो आहे, भय्यू महाराजांचं शेवटचं ट्विट


भय्यू महाराजांची सुसाईड नोट सापडली!


नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?


EXCLUSIVE : भय्यू महाराजांनी मंत्रिपद का घेतलं? भय्यू महाराजांशी खास बातचित    

भय्यू महाराज पुन्हा विवाहबंधनात! 

मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं मत 

 धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही? : भय्यूजी महाराज  

भय्यू महाराजांसह पाच आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा   

संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज   

कोपर्डीतल्या विद्यार्थिनींनी शिक्षण सोडू नये, भय्यू महाराजांचा पुढाकार